सोयाबीन दरात अल्पशी वाढ; तुरीचे दर कोसळले!

By admin | Published: June 25, 2017 08:27 AM2017-06-25T08:27:16+5:302017-06-25T08:27:16+5:30

आवक घटली: सोयाबीन प्रतिक्ंिवटल २,७३५ रुपये भाव

Soybean prices increase; Prices fell! | सोयाबीन दरात अल्पशी वाढ; तुरीचे दर कोसळले!

सोयाबीन दरात अल्पशी वाढ; तुरीचे दर कोसळले!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ झाली असून, शनिवारी हे दर प्रतिक्ंिवटल २,७३५ रुपयांपर्यंत पोहोचले होते. आजमितीस अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १,४५७ क्ंिवटल एवढी आवक होती. नाफेडवरील मोजणीचा फटका तुरीला बसला आहे, त्यामुळे तुरीचे दर कोसळले आहेत. आजमितीस बाजारात जास्तीत जास्त प्रतिक्ंिवटल ३,५७० रुपये दराने तुरीची खरेदी सुरू आहे.
मागील वर्षी सोयाबीनचे उत्पादन भरपूर झाले; परंतु दरच नसल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक पेरणीकडे पाठ फिरवितानाचे चित्र आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांनी कापूस पिकाची पेरणी केली आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांत सोयाबीनच्या दरात अल्पशी सुधारणा झाली आहे. सोयाबीनचे जास्तीत जास्त दर हे २,७३५ रुपये प्रतिक्ंिवटलपर्यंत आहेत. कमीत कमी दर २,३०० रुपये प्रतिक्ंिवटल असून, सरासरी २,५१५ रुपये प्रतिक्ंिवटलप्रमाणे सोयाबीन खरेदी सुरू आहे. शनिवारी बाजार समितीमध्ये १,४५७ क्ंिवटल सोयाबीनची आवक होती.
दरम्यान, तुरीचे दर कमी झाले असून, तुरीचे जास्तीत जास्त दर हे ३,७०० रुपये प्रतिक्ंिवटल एवढे आहेत. कमीत कमी ३,३०० तर सरासरी दर हे ३,५०० रुपये प्रतिक्ंिवटल आहेत. नाफेडकडे पडलेली तूर आणि शेतकऱ्यांना पीक-पेरणीसाठी हव्या असलेल्या पैशांपोटी शेतकऱ्यांनी कमी किमतीत तूर विक्रीला काढली आहे. शनिवारी बाजारात ७६२ क्ंिवटल एवढी तुरीची आवक झाली होती. हरभऱ्याचे जास्तीत जास्त दर ४,८०० रुपये प्रतिक्ंिवटल असून, कमीत कमी ४,५५० तर सरासरी दर ४,७७५ रुपये प्रतिक्ंिवटल आहेत. मुगाचे सरासरी दर प्रतिक्ंिवटल ४,१०० रुपये आहेत. उडिदाचे ४,००० तर शरबती गव्हाचे सरासरी प्रतिक्ंिवटल २,०६० रुपये दर आहेत. मुगाची आवक ८४ क्विंटल, उडीद ६५ क्ंिवटल तर गव्हाची आवक बाजारात ५५ क्ंिवटल एवढीच होती. लोकल ज्वारीचे सरासरी प्रतिक्ंिवटल दर हे १,४७५ रुपये आहेत. आवक मात्र शनिवारी ८० क्ंिवटल होेती.

Web Title: Soybean prices increase; Prices fell!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.