सोयाबीनचे दर पुन्हा वाढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 01:46 PM2020-01-12T13:46:55+5:302020-01-12T13:47:01+5:30
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवार, ११ जानेवारी रोजी प्रतिक्विंटल ४,१७५ तर शनिवारी ४,१६० रुपयांनी व्यवहार झाले.
अकोला : सोयाबीनचे दर प्रतिक्ंिवटल ४,१७५ रुपयांवर पोहोचले असून, यावर्षीचे हे सर्वाधिक दर आहेत. बाजारात सोयबीनची आवकही वाढली आहे. परतीच्या पावसाने सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. प्रतही खराब झाली आहे; परंतु चांगल्या पिवळ्या सोयाबीनला चांगले दर मिळत आहेत. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवार, ११ जानेवारी रोजी प्रतिक्विंटल ४,१७५ तर शनिवारी ४,१६० रुपयांनी व्यवहार झाले. शुक्रवारी ही आवक २,९८७ क्ंिवटल होती.
पावसाने सोयाबीन काळवंडल्याने बहुतांश अल्पभूधारक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणी हंगामाच्या सुरुवातीलाच विक्री केली. एकतर सोयाबीन प्रत खराब होती तसेच ओलावाही असल्याने शेतकऱ्यांना कमी दरात सोयाबीन विकण्याची वेळ आली. सध्या दरात बरीच सुधारणा झाली असून, हे दर आणखी वाढण्याचे संकेत व्यापारी वर्तुळातून प्राप्त होत आहेत. सध्या सोयाबीनला सरासरी प्रतिक्ंिवटल ३,९५० आहेत. जास्तीत जास्त दर हे ४,१७५ रुपयांववर पोहोचले आहेत. हरभºयाचे दर प्रतिक्ंिवटल सरासरी ३,९५० रुपये आहेत. जास्तीचे दर हे ४,१५० रुपयांवर पोहोेचले. नवीन तूर आता बाजारात येणार आहे. सध्या बाजारात तुरीचे सरासरी प्रतिक्ंिवटल दर ४,३०० रुपये असून, जास्तीत जास्त दर ४,६०० रुपये आहेत.