अनुदानित सोयाबीनचा बाजारात तुटवडा; महाबीजकडून पुरवठ्याला उशीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 04:10 PM2018-06-26T16:10:45+5:302018-06-26T16:14:28+5:30

कृषी विभागाकडून अनुदान्ाित सोयाबीन बियाण्यांची मागणी झाल्यानंतरही महाबीजकडून त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने सोमवारी बाजारात तुटवडा असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी कृषी विभागाच्या अधिकाºयांकडे केल्या.

soybean seeds scarcity; farmer not get seed in akola market | अनुदानित सोयाबीनचा बाजारात तुटवडा; महाबीजकडून पुरवठ्याला उशीर 

अनुदानित सोयाबीनचा बाजारात तुटवडा; महाबीजकडून पुरवठ्याला उशीर 

Next
ठळक मुद्देराज्याच्या कृषी विभागाने शेतकºयांसाठी सोयाबीन बियाणे देण्याची योजना राबवली. अकोला तालुक्यात १३ हजार परमिट देण्यात आले.सोमवारी काही केंद्रात गेलेल्या शेतकºयांना परमिटवर अनुदानित बियाणे देण्यास नकार देण्यात आला.

अकोला : पावसाच्या अंदाजानुसार सुरुवातीला शेतकऱ्यांनी कापूस, मूग, उडिदाचे नियोजन केल्यानंतर आता उशीर झाल्याने सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता निर्माण झाली. त्याचवेळी कृषी विभागाकडून अनुदान्ाित सोयाबीन बियाण्यांची मागणी झाल्यानंतरही महाबीजकडून त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने सोमवारी बाजारात तुटवडा असल्याच्या तक्रारी शेतकºयांनी कृषी विभागाच्या अधिकाºयांकडे केल्या. शहरातील चार विक्रेत्यांकडेच महाबीजने अनुदानित बियाणे उपलब्ध केल्याची माहिती आहे.
राज्याच्या कृषी विभागाने शेतकºयांसाठी सोयाबीन बियाणे देण्याची योजना राबवली. त्यासाठी महाबीजला पुरवठा आदेश देण्यात आला. कृषी विभागाने शेतकºयांना अनुदानित बियाण्यांसाठी परमिट वाटप केले. अकोला तालुक्यात १३ हजार परमिट देण्यात आले. अकोला शहरातील स्वाती, प्रकाश ट्रेडिंग, कोरपे, स्नेहसागर एंटरप्रायजेस, शाह एजंसी या कृषी केंद्रात महाबीजने अनुदानित बियाणे ठेवले. सोमवारी काही केंद्रात गेलेल्या शेतकºयांना परमिटवर अनुदानित बियाणे देण्यास नकार देण्यात आला. महाबीजने परमिटवर वाटपासाठी असलेले अनुदानित बियाणे दिले नाही, त्यामुळ ते देता येत नाही, असा पवित्रा काही कृषी केंद्र संचालकांनी घेतला. त्यामुळे शेतकºयांनी केंद्रातील फलकावर संपर्कासाठी नावे असलेल्या कृषी विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला. अधिकाºयांनी संंबंधित शेतकºयांना परमिटवर बियाणे वाटप करण्याचे बजावले. हा प्रकार दिवसभर सुरूच होता. त्याचा त्रास लाभार्थी शेतकºयांसह कृषी विभागाच्या अधिकाºयांनाही झाला.
 

महाबीजकडून पुरवठ्याची गती मंदावली
अनुदानित बियाणे पुरवठा करताना महाबीजची गती मंदावली. शहरातील चारऐवजी एक किंवा दोनच केंद्रात बियाणे देणे, दिवसाआड कृषी केंद्र बदलणे, त्याची माहिती लाभार्थी शेतकºयांना नसल्याने त्यांना चारही केंद्रात चकरा माराव्या लागत आहेत. सोबतच मूर्तिजापूर येथूनही तक्रारी आल्या आहेत. त्यातूनच शेतकºयांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.


  पावसाच्या विलंबामुळे सोयाबीन क्षेत्र वाढणार!
पावसाला विलंब झाल्यामुळे कापूस, मूग, उडीद पिकांचे क्षेत्र घटणार आहे. त्याऐवजी कमी कालावधीचे सोयाबीन पीक घेण्याकडे शेतकºयांचा कल आहे. त्यामुळेच आधी कापूस पीक पेरण्याच्या तयारीत असलेले शेतकरी आता सोयाबीनसाठी बाजारात धाव घेत आहेत. तो अंदाज घेत महाबीजकडे कृषी विभागाने मागणी केलेल्या ३० हजार क्विंटलमध्ये पाच हजारांची भर टाकत पुरवठा केल्याची माहिती आहे.
 
कृषी विभागाच्या मागणीनुसार अनुदानित सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा करताना महाबीजकडून उशीर होत आहे. त्यामध्ये सुधारणेची गरज आहे. त्यातच इतर तालुक्याच्या सीमावर्ती गावातील परमिटधारक शेतकरीही अकोल्यातच येत असल्याने ताण वाढला आहे.
- अजय शास्त्री, तालुका कृषी अधिकारी, अकोला.

 

Web Title: soybean seeds scarcity; farmer not get seed in akola market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.