सोयाबीनने ओलांडला ५,७०० रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:17 AM2021-03-28T04:17:46+5:302021-03-28T04:17:46+5:30
खरीप हंगामात सोयाबीन काढणीवर असताना अवकाळी पावसामुळे पिकाला फटका बसला. त्यामुुळे उत्पादनात मोठी घट झाली. सुरुवातीच्या काळात बाजार समित्यांमध्ये ...
खरीप हंगामात सोयाबीन काढणीवर असताना अवकाळी पावसामुळे पिकाला फटका बसला. त्यामुुळे उत्पादनात मोठी घट झाली. सुरुवातीच्या काळात बाजार समित्यांमध्ये अल्प दराने सोयाबीनची खरेदी केली जात होती. परिणामी, शेतकरी चिंतित होते. ब्राझील, अमेरिकेसारख्या सोयाबीन उत्पादक देशांमध्येही शेतमालाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यामुळे सोयाबीनच्या मागणीत आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढ झाली. चीनकडूनही सोयाबीनची मागणी होत असल्याने देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात तेजी येऊ लागली. याचा परिणाम विदर्भातील बाजारात दिसून येऊ लागला. त्यात अकोला जिल्ह्यातील बाजारातही सोयाबीनच्या दराने उच्चांक गाठला आहे. बाजारात सोयाबीनचा दर ५ हजार ७०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अकोला बाजार समितीत मागील दोन- तीन दिवसांपासून चांगल्या दर्जाच्या मालाला ५ हजार ७०० रुपयांपेक्षा अधिक दर मिळत आहे.