कोरोनाबाधितांच्या मतदानासाठी विशेष व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:45 AM2021-01-13T04:45:49+5:302021-01-13T04:45:49+5:30
मतदान केंद्रांवर अशी घेतली जाणार काळजी! ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या कोरोनाबाधितांमुळे इतरांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी विशेष ...
मतदान केंद्रांवर अशी घेतली जाणार काळजी!
ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या कोरोनाबाधितांमुळे इतरांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी मतदान केंद्रांवर सॅनियटाझरची व्यवस्था करण्यात येणार आहे. निरोगी किंवा कोरोना संसर्ग नसलेल्या मतदारांचे मतदान पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर अतिरिक्त वेळेत कोरोनाबाधितांना मतदान करण्याची मुभा दिली जाणार आहे.
जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची आकडेवारी
क्वारंटाइन ...........
१८ वर्षांवरील .............
क्वारंटाइन
उपचार सुरू
.......................
एकूण पाॅझिटिव्ह
.....................
जिल्ह्यात एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या
..........................
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेत मतदान करण्यासाठी येणाऱ्या कोरोनाबाधित मतदारांसाठी सायंकाळी चार वाजल्यानंतर राखीव वेळ ठेवण्यात आली आहे. तसेच कोरोनाबाधितांच्या मतदानासाठी मतदान केंद्रांवर आवश्यक ती काळजी घेऊन विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
- संजय खडसे,
निवासी उपजिल्हाधिकारी