खासगी बसमध्ये विशेष खबरदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:20 AM2020-12-06T04:20:15+5:302020-12-06T04:20:15+5:30
भरधाव वाहनांमुळे अपघाताची भीती अकोला: शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने अनेक वाहने अशोक वाटिका ते शासकीय बगिचा ...
भरधाव वाहनांमुळे अपघाताची भीती
अकोला: शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने अनेक वाहने अशोक वाटिका ते शासकीय बगिचा या मार्गावरून भरधाव जातात. या मार्गावर परिसरातील नागरिक रात्रीचा फेरफटका मारतात. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. अशा परिस्थितीत भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावर नेहमीच अपघाताची भीती असते. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
बसस्थानकात कचरा
अकोला: लॉकडाऊननंतर एसटी बसेस आता पूर्ण क्षमतेने धावत असल्याने बसस्थानकावर प्रवाशांचीही गर्दी वाढली आहे मात्र प्रवाशांकडून बसस्थानक परिसरात कचरा केला जात असल्याचेही चित्र दिसून येत आहे. शिवाय, जवळपासचे व्यावसायिकदेखील बसस्थानक परिसरात कचरा करीत असल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे.
खाऊगल्लीत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन नाही
अकोला: अनलॉकमध्ये काही दिवसांपूर्वीच हॉटेल्स व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली होती. त्यानुसार, शहरातील हॉटेल्स सुरू झाल्या असून, खाऊगल्लीतही खाद्यपदार्थांचे स्टॉल पूर्ववत सुरू झालेत. या ठिकाणी खवय्यांचीही गर्दी वाढत आहे; मात्र प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन होताना दिसून येत नाही. त्यामुळे हा प्रकार कोरोनाच्या फैलावाला कारणीभूत ठरत आहे.
नेटवर्क नसल्याने नागरिक त्रस्त
अकोला: गत दोन दिवसांपासून शहरात मोबाइल नेटवर्कची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे अनेकांना इंटरनेटसह कॉलिंगच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. इंटरनेट व फोन कॉलमध्ये व्यत्यय आल्याने नागरिक त्रस्त होत आहेत. शहरातील काही भागात मात्र मोबाइल सेवा सुरळीत असल्याचे निदर्शनास आले आहे.