विशेष पथकाचा वरली अड्डय़ावर छापा
By admin | Published: April 11, 2017 01:56 AM2017-04-11T01:56:46+5:302017-04-11T01:56:46+5:30
४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
अकोला: कौलखेड चौकात सुरू असलेल्या वरली अड्डय़ावर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी छापा मारून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कौलखेड परिसरातील खेतान नगरातील रहिवासी अरुण वाल्मीकराव भगत, हरिभाऊ काशीराम दोड आणि पावसाळे ले-आउटमधील रहिवासी गजानन जगन्नाथ भोडे हे तिघे वरली अड्डय़ावर वरली चालवित असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाला मिळाली. यावरून विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी पथकासह छापा टाकून सदर तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ हजार रुपयांचा मोबाइल आणि १ हजार ५00 रुपये रोख असा एकूण साडेतीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर तिघांविरुद्ध खदान पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी केली.