विशेष पथकाची काटेपूर्णा येथील वरली मटक्यावर धाड़
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 04:34 PM2018-07-21T16:34:12+5:302018-07-21T16:36:16+5:30
बोरगाव मंजू : जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने दुपारी काटेपूर्णा येथील वरली मटक्यावर छापा टाकून चार जणांना ताब्यात घेवुन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.
बोरगाव मंजू : जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने दुपारी काटेपूर्णा येथील वरली मटक्यावर छापा टाकून चार जणांना ताब्यात घेवुन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. बोरगांव मंजू पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या काटेपूर्णा येथे अवैद्य वरली मटका सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना मीळाली त्यावरून त्यांनी आपल्या पथकासह काटेपूर्णा येथील आठवडी बाजारा नजीक सुरु असलेल्या वरली मटक्यावर छापा टाकला. घटनास्थळावरुण जगन्नाथ घटे , धन्नु ढोले, ज्योतिबा डोंगरदिवे, प्रेमनाथ गजभिये या चार जणांना ताब्यात घेतले. मुद्देमाल नगदी 2850, चार मोबाईल किंमत चार हजार रूपये, आणि वरली मटका साहित्य असा एकूण सहा हजार आठशे पन्नास रुपयाचा एवज जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे.
बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्द येणार्या ग्रामीण भागात खुले आम अवैधरीत्या व्यवसाकांनी आपले व्यवसाय थाटले आहेत. या आधी सुद्धा धोतडीॅ येथील एका महिलेने अवैधरीत्या देशी दारू विक्री होत असल्याची तक्रार बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दिली होती; परंतु संबंधितांनी दुर्लक्ष केले होते. तर सदर महिलेने 22 एप्रिल 2018 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला यांच्या कार्यालया समोर विषारी औषध प्रशासन केले होते. हे विशेष.