सिंदखेड येथील जुगारावर विशेष पथकाची छापेमारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 05:37 PM2019-10-23T17:37:31+5:302019-10-23T17:37:40+5:30
दहा जणांना अटक केली त्यांच्याकडून 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अकोला -बाशर््िाटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंदखेड मोरेश्वर येथे खुलेआम सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकर व त्यांच्या पथकाने बुधवारी दुपारी छापेमारी केली. या जुगार अड्डयावरुन दहा जणांना अटक केली त्यांच्याकडून 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुध्द बाशीर्टाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंदखेड मोरेश्वर येथील मंदिराजवळ जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरून विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकर व त्यांच्या पथकाने छापा टाकून रामदास गणपत गाडगे रा. राजंदा, शिवा देविदास सोळंके रा.सिंदखेड, ज्ञानदेव नारायण धांडे रा. सिांदखेड, अशोक तुळशीराम भाकरे रा. सिंदखेड, राहुल गौतम मगर रा. सिंदखेड, भीमराव जयसिंग चव्हाण रा. सिंदखेड, विलास महादेव वानखडे रा. सिंंदखेड, अंबादास महादेव भोयर रा. कापशी, शिवदास श्रीराम कोगदे, रा. सिंंदखेड, प्रभाकर राजाराम काळे रा. राजंदा या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून वीस हजार रुपयांची रोख, पंधरा हजार रुपये किमतीचे 7 मोबाईल तसेच वरली आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींविरुद्ध बाशीर्टाकळी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अमोघ गावकर ,अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद कुमार बहाकर व त्यांच्या पथकाने केली.