विशेष पथकाची दारु अड्ड्यावर छापेमारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 06:39 PM2020-11-10T18:39:30+5:302020-11-10T18:39:43+5:30
Akola Crime News विदेशी बिअर व देशी दारु असा तीन हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला.
अकाेला : पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी त्यांच्या पथकासह रामदास पेठ पाेलीस स्टेशन व अकाेट फैल पाेलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआम सुरू असलेल्या अवैध दारु अड्ड्यांवर छापेमारी केली. मंगळवारी केलेल्या या कारवाईत ६० हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. अकाेट फैल पाेलीस ठाण्याच्या हद्दीत परदेसीपुरा येथे देशी व विदेशी दारुची अवैधरीत्या वाहतूक व विक्री सुरू असल्याची माहिती पाेलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून दाेन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विदेशी बिअर व देशी दारु असा तीन हजार रुपयांचा दारुसाठा जप्त केला. त्यानंतर रामदास पेठ पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रामदास पेठ पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दारु दुकानावरून अवैधरीत्या दारुची वाहतूक करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख तथा पाेलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.