‘चेन स्नॅचिंग’ रोखण्यासाठी ‘स्पेशल टीम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 02:59 PM2018-11-16T14:59:30+5:302018-11-16T14:59:52+5:30

अकोला: अकोला पोलीस प्रशासनाची झोप उडविणाऱ्या तसेच जिल्ह्यात गत तीन ते पाच वर्षांपासून अत्यंत गंभीर असलेल्या ‘चेन स्नॅचिंग’च्या गुन्ह्यांवर अंकुश मिळविण्यासाठी एक विशेष टीम काम करीत आहे.

Special team to stop 'chain snatching' | ‘चेन स्नॅचिंग’ रोखण्यासाठी ‘स्पेशल टीम’

‘चेन स्नॅचिंग’ रोखण्यासाठी ‘स्पेशल टीम’

Next

- सचिन राऊत

अकोला: अकोला पोलीस प्रशासनाची झोप उडविणाऱ्या तसेच जिल्ह्यात गत तीन ते पाच वर्षांपासून अत्यंत गंभीर असलेल्या ‘चेन स्नॅचिंग’च्या गुन्ह्यांवर अंकुश मिळविण्यासाठी एक विशेष टीम काम करीत आहे. गत एका महिन्यापासून ही टीम रात्रंदिवस झटत असल्याने सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना ‘ब्रेक’ लागल्याचे वास्तव आहे.
शहराच्या खदान, सिव्हिल लाइन्स, रामदास पेठ आणि सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरीचे प्रताप गत पाच वर्षांपासून सुरू आहेत. यासाठी पोलीस अधीक्षकांकडून वारंवार बैठका घेऊन या चोºया रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत; मात्र त्याला पाहिजे तशा प्रकारे यश मिळत नसल्याने आता एक विशेष टीमच यासाठी कार्यरत असून, त्याचे सकारात्मक परिणामही समोर येत आहेत.

सहा शहरात अधिक धुडगूस
अकोला, अमरावती, दर्यापूर, मूर्तिजापूर, अंजनगाव व परतवाडा या सहा शहरात एकाच सोनसाखळी चोरट्याने प्रचंड हैदोस घातला असून, दोन जिल्ह्यातील पोलिसांच्या नाकात दम आणला आहे. सदरचा चोरटा अद्यापही पोलिसांच्या जाळ्याबाहेर आहे; मात्र या चोरट्याची पूर्ण ‘कुंडली’च पोलिसांनी गोळा केली असून, लवकरच त्याला बेड्या ठोकण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

सोनसाखळी चोरीची फिफ्टी
सहा शहरात महिलांच्या सोनसाखळ्या चोरण्यात पटाईत असलेल्या या एकाच चोरट्याने आतापर्यंत तब्बल ५० वर अधिक महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी पळविल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या चोरट्याने तब्बल ५० ते ६० लाख रुपयांचे सोने चोरी केल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

अशी आहे स्पेशल टीम
सोनसाखळी चोरट्यांच्या शोधासाठी असलेली एक विशेष टीम कार्यरत असून, रोज १०० ते १५० किलोमीटर फिरण्याचे काम या टीममधील प्रत्येक सदस्य करीत आहे. या टीममध्ये शहर पोलीस उपअधीक्षकांचे पथक, सिव्हिल लाइन्स, खदान, सिटी कोतवाली व रामदास पेठ पोलीस ठाण्यातील डीबी पथकात काम करीत असलेले पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या मेहनतीमुळेच गत एक महिन्यापासून सोनसाखळी चोरीला बे्रक लागला हे निश्चित.

 

सोनसाखळी चोरट्यांच्या मागावर एक विशेष टीमच कार्यरत आहे. या चोरट्यांची माहितीच गोळा करण्यात आली असून, त्यांना लवकरच बेड्या ठोकण्यात येतील, असा विश्वास आहे. पोलिसांची ही टीम रात्रंदिवस कार्यरत असल्यामुळे सोनसाखळी चोरीला आळा बसला आहे.
- उमेश माने पाटील
शहर पोलीस उपअधीक्षक, अकोला.

 

Web Title: Special team to stop 'chain snatching'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.