नांदेड-श्री गंगानगर दरम्यान एक एप्रीलपासून विशेष रेल्वे गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 05:41 PM2021-03-20T17:41:02+5:302021-03-20T17:41:36+5:30

Special train between Nanded-Sri Ganganagar अकोलेकरांना राजस्थानकडे जाण्यासाठी आणखी एक विशेष गाडी मिळाली आहे.

Special train between Nanded-Sri Ganganagar from April one | नांदेड-श्री गंगानगर दरम्यान एक एप्रीलपासून विशेष रेल्वे गाडी

नांदेड-श्री गंगानगर दरम्यान एक एप्रीलपासून विशेष रेल्वे गाडी

Next

अकोला : रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी हजूर साहिब नांदेड आणि श्री गंगानगर दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी अकोला स्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकरांना राजस्थानकडे जाण्यासाठी आणखी एक विशेष गाडी मिळाली आहे.

गाडी क्रमांक ०७६२३ अप ही गाडी हजूर साहिब नांदेड येथून १ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर गुरुवारी सकाळी ०६.५० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सायंकाळी ०७.२० वाजता श्री गंगानगरला पोहोचेल. ही गाडी दर गुरुवारी अकोला स्थानकावर येईल.

गाडी क्रमांक ०७६२४ डाऊन ही गाडी श्री गंगानगर येथून ३ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर शनिवारी दुपारी १२.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री ०२.३० वाजता हजूर साहिब नांदेडला पोहोचेल. ही गाडी दर रविवारी अकोला स्थानकावर येणार आहे.

या गाडीला अकोला, शेगाव, मलकापूर , भुसावळ, जळगांव, अमळनेर, नंदुरबार आदी ठिकाणी थांबा असणार आहे.

एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी,एक वातानुकुलीत तृतीय श्रेणी, नऊ शयनयान आणि दोन द्वितीय श्रेणी आसन, अशी या गाडीची संरचणा आहे. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.

प्रवाशांना प्रवासादरम्यान कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

Web Title: Special train between Nanded-Sri Ganganagar from April one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.