अयोध्येसाठी अकोलामार्गे १८ फेब्रुवारीला ‘आस्था स्पेशल रेलवे’ नावाने विशेष रेल्वे

By Atul.jaiswal | Published: January 20, 2024 01:20 PM2024-01-20T13:20:03+5:302024-01-20T13:20:32+5:30

प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता यावे यासाठी भारतीय रेल्वे भारतीय रेल्वे ३५० हून अधिक विशेष चालवणार आहे

Special train named 'Aastha Special Railway' for Ayodhya via Akola on February 18 | अयोध्येसाठी अकोलामार्गे १८ फेब्रुवारीला ‘आस्था स्पेशल रेलवे’ नावाने विशेष रेल्वे

अयोध्येसाठी अकोलामार्गे १८ फेब्रुवारीला ‘आस्था स्पेशल रेलवे’ नावाने विशेष रेल्वे

अतुल जयस्वाल, अकोला: अयोध्या येथील प्रभू श्रीराम यांचा प्राणपतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला होणार असून, या दिवसापासूनच मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. प्रभू श्रीरामांचे दर्शन घेता यावे यासाठी भारतीय रेल्वे भारतीय रेल्वे ३५० हून अधिक विशेष चालवणार आहे. या गाड्यांना ‘आस्था स्पेशल रेलवे’ म्हटले जात आहे.

देशभरातील विविध ठिकाणांहून अयोध्येसाठी रेल्वेकडून आस्था स्पेशल रेलवे चालवल्या जाणार आहेत. यात अकोलामार्गे सिकंदराबाद-अयोध्या धाम विशेष रेल्वे १८ फेब्रुवारीला धावणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, ०७२९७ सिकंदराबाद-अयोध्या धाम विशेष रेल्वे रविवार, फेब्रुवारी रोजी सिकंदराबाद येथून दुपारी १५:०० वाजता रवाना होऊन अयोध्या धाम येथे मंगळवार, २० फेब्रुवारी रोजी पहाटे ०्र३:३५ वाजता पोहोचेल. ही गाडी अकोला स्थानकावर सोमवार, १९ फेब्रुवारीला ०२:१५ वाजता (रविवारची रात्र)येणार आहे. परतीच्या प्रवासात ०७२९७ अयोध्या धाम-सिकंदराबाद विशेष रेल्वे बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी अयोध्या धाम येथून दुपारी १४:२० वाजता रवाना होऊन शुक्रवार, २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ०९:१५ वाजता सिकंदराबाद येथे पोहोचेल. ही गाडी गुरुवार, २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १६:३५ वाजता अकोला स्थानकावर येणार आहे.

Web Title: Special train named 'Aastha Special Railway' for Ayodhya via Akola on February 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.