अजमेर उरूसनिमित्त ११ मार्चपासून विशेष रेल्वेगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 01:44 PM2019-03-10T13:44:49+5:302019-03-10T13:45:40+5:30
अकोला: अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गाहवर आयोजित वार्षिक उरूससाठी दक्षिण मध्य रेल्वेच्यावतीने विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत.
अकोला: अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गाहवर आयोजित वार्षिक उरूससाठी दक्षिण मध्य रेल्वेच्यावतीने विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. या रेल्वेगाड्या या महिन्यात अकोल्यातून धावणार आहेत. ०७६४७ क्रमांकाची रेल्वेगाडी नांदेड येथून अजमेर-मदार चालेल. या रेल्वेगाड्या सोमवार, ११ मार्चपासून धावतील. नांदेडहून ही गाडी सायंकाळी १६.५० ला सुटेल. ही रेल्वेगाडी पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, अजमेर येथे थांबेल. दुसऱ्या दिवशी रात्री ही गाडी २२.५५ ला मदार येथून नांदेडकडे धावेल. १६ मार्च रोजी रात्री १९.२५ ला मदार येथे पोहोचेल. त्यानंतर १८ मार्च रोजी सकाळी ५ वाजता नांदेडला पोहोचेल. ०७१२९-०७१३० क्रमांकाची रेल्वेगाडी काचीगुडा-अजमेर-काचीगुडा १० मार्च रोजी रात्री २३.३० वाजता काचीगुडाहून सुटेल. सोबतच ११ मार्चला सकाळी ५.२० वाजता नांदेडहून रवाना होईल. ही रेल्वेगाडी वाशिम आणि अकोला होत १३ मार्चला सकाळी ११.३० वाजता अजमेर येथे पोहोचेल. परतीमध्ये या रेल्वेगाडीचा क्रमांक ०७१३० होऊन ही गाडी मदारहून १६ मार्च रोजी रवाना होईल. अजमेर येथून सायंकाळी १७.४० ला सुटेल. १८ मार्च रोजी सकाळी ३ वाजता ती काचीगुडा पोहोचेल. या रेल्वेगाडीला १७ बोगी राहणार आहेत. ०७१२५-०७१२६ क्रमांकाची रेल्वेगाडी हैदराबाद-अजमेर-हैदराबाद १० मार्चला रात्री २०.०० वाजता हैदराबादहून निघेल. ही रेल्वे नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला होत १२ मार्च रोजी सकाळी ३.४० वाजता अजमेरला पोहोचेल. परतीमध्ये ०७१२६ अजमेर-हैदराबाद १५ मार्चला रात्री २३.२५ ला अजमेरहून सुटेल. ही रेल्वेगाडी उज्जैन, खंडवा, अकोला, हिंगोली, नांदेड होत १७ मार्च रोजी सकाळी १० वाजता हैदराबादला पोहोचणार आहे.