नाताळनिमित्त २२ ते २७ डिसेंबर दरम्यान सोलापूर-नागपूर विशेष रेल्वेगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:47 PM2019-12-21T12:47:14+5:302019-12-21T12:47:21+5:30
ख्रिसमस निमित्त सोलापुर- नागपुर दरम्यान विशेष गाड़ी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
अकोला : मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने ख्रिसमस निमित्त सोलापुर- नागपुर दरम्यान विशेष गाड़ी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
गाड़ी क्रमांक ०२१११ डाउन सोलापुर- नागपुर विशेष गाड़ी रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी सोलापुरहून २०.०० वाजता निघेल. ही गाडी सोमवारी १३.३० वाजता नागपुर येथे पोहोचेल. गाड़ी क्रमांक ०२११२ अप नागपुर- सोलापुर विशेष गाड़ी सोमवार दिनांक २३ डिसेंबर रोजी नागपुर येथून १५.०० वाजता सुटेल. ही गाडी मंगळवारी सोलापुर येथे ०८.४० वाजता पोहोचेल. या गाड्यांना कुदुर्वाडी , दौंड , अहमदनगर , बेलापुर , कोपरगाव , मनमाड , भुसावळ , शेगाव , अकोला , बडनेरा , धामनगाव , वर्धा या ठिकाणी थांबा राहिल. या गाडयांना १० वातानुकूलीत,६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे राहतील.
सोलापुर ते नागपुर दरम्यान विशेष गाडीच्या तीन फेऱ्या होणार आहेत. गाडी क्रमांक ०२११३ डाउन सोलापुर- नागपुर विशेष गाडी गुरुवार दिनांक डिसेंबर रोजी सोलापुर येथून १३.०० वाजता सुटेल. ही गाडी शुक्रवारी सकाळी ०५.१५ वाजता नागपूरला पोहोचेल. गाड़ी क्रमांक ०२११४ अप नागपुर- सोलापुर विशेष गाडी शुक्रवार दिनांक २७डिसेंबर रोजी नागपुर येथून १९.४० वाजता सुटेल. ही गाडी दुसºया दिवशी १३.१० वाजता सोलापुर येते पोहोचेल. या गाडीला कुदुर्वाडी , दौंड , अहमदनगर , बेलापुर , कोपरगाव , मनमाड , भुसावळ , शेगांव , अकोला , बडनेरा , धामनगाव , वर्धा येथे थाबा राहील.