दिवाळीनिमित्त मध्य रेल्वे सोडणार विशेष गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 11:15 AM2019-09-22T11:15:23+5:302019-09-22T11:15:30+5:30
मध्य रेल्वे प्रशासनाने काही विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
अकोला : दिवाळीनिमित्त होणारी वाहतूक लक्षात घेत मध्य रेल्वे प्रशासनाने काही विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सणासुदीत प्रवाशांना सुविधा व्हावी म्हणून या गाड्या सोडण्यात येत असून, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गाडी क्रमांक ०२१०७ डाउन, मुंबई-लखनऊसाठी ( मंगळवार) ६ फेऱ्या राहणार आहेत. सुपर फास्ट असलेली ही विशेष रेल्वेगाडी साप्ताहिक असून, मुंबईहून १ आॅक्टोबर रोजी १४.१० वाजता प्रस्थान करीत बुधवारी दुपारी १३.१५ वाजता लखनऊला पोहोचेल. या गाडीला दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, झासी, कानपूर येथे थांबा राहणार आहे.
गाडी क्रमांक ०१०२० अप लखनऊ ते मुंबई ( बुधवार) ६ फेºया राहणार आहेत. सुपर फास्ट असलेली ही विशेष रेल्वेगाडी साप्ताहिक असून, लखनऊ ते मुंबई धावणार आहे. बुधवार, २ आॅक्टोबर रोजी १५.०० रोजी ही गाडी निघेल ती गुरुवारी दुपारी १७.३५ वाजता मुंबई येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०२५ डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंडूआ ( बुधवार) ३ फेºया राहणार आहेत. सुपर फास्ट असलेली ही विशेष रेल्वेगाडी साप्ताहिक असून, लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंडूआ धावणार आहे. बुधवार, २३ आॅक्टोबर ००.४५ वाजता ही गाडी प्रस्थान करेल. गुरुवारी सकाळी ०४.४५ वाजता ही गाडी मंडूआ येथे पोहोचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, अलाहाबाद, ज्ञानपूर येथे थांबा राहील.
गाडी क्रमांक ०२०४६ अप मंडूआ ते लोकमान्य टिलक टर्मिनस (गुरुवार) ३ फेºया राहतील. सुपर फास्ट असलेली ही विशेष रेल्वेगाडी साप्ताहिक असून, मंडूआ-लोकमान्य टिळक टर्मिनस गुरुवार, २४ आॅक्टोबर रोजी ६.३० वाजता प्रस्थान करेल. ही गाडी शुक्रवारी सकाळी ८.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११३३ डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस-बरौनीच्या (गुरुवार) ३ फेºया राहतील. ही सुपर फास्ट विशेष रेल्वेगाडी साप्ताहिक लोकमान्य टिळक टर्मिनस-बरौनी गुरुवार, २४ आॅक्टोबर रोजी ५.१० वाजता प्रस्थान करेल. ही गाडी शुक्रवारी १५ वाजता बरौनी येथे पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, अलाहाबाद, चोकी, मिर्जापूर, पंडित दीनदयाल उपाध्य जंक्शन, बक्सर, आरा, पाटलीपुत्र, हाजीपूर येथे थांबेल.
गाडी क्रमांक ०११३४ अप बरौनी-लोकमान्य टिळक टर्मिनसच्या ( शुक्रवार) ३ फेºया राहतील. गाडी क्रमांक ०११३४ अप सुपर फास्ट विशेष रेल्वेगाडी साप्ताहिक असून, बरौनी-लोकमान्य टिळक टर्मिनस शुक्रवार, २५ आॅक्टोबर रोजी १९.३० वाजता प्रस्थान करेल. ही गाडी रविवार सकाळी ५.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४५३ डाउन पुणे-गोरखपूर (सोमवार)च्या ३ फेºया राहतील.
गाडी क्रमांक ०१५३३ डाउन सुपर फास्ट विशेष रेल्वेगाडी साप्ताहिक ्असून, पुणे-गोरखपूर सोमवार दिनांक आॅक्टोबर रोजी २१.३० वाजता प्रस्थान करून बुधवारी ८.३० वाजता गोरखपूरला पोहोचेल. ही गाडी अहमदनगर, बेलापूर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, झासी, कानपूर, लखनऊ, बाराबंकी, गोंडा, बस्ती येथे थांबेल.
गाडी क्रमांक ०१४५४ अप गोरखपूर-पुणेच्या ( बुधवार) ३ फेºया होतील. सुपर फास्ट असलेली ही विशेष रेल्वेगाडी गोरखपूर-पुणे बुधवार आॅक्टोबर रोजी १०.४५ वाजता प्रस्थान करून गुरुवारी २१ वाजता पुण्याला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१२०७ अप नागपूर-राजकोटच्या (सोमवार) ३ फेºया राहतील. सुपर फास्ट असलेली ही विशेष रेल्वेगाडी नागपूर-राजकोट सोमवार, २१ आॅक्टोबर रोजी १९.५० वाजता प्रस्थान करून राजकोट येथे मंगळवारी १६.३० वाजता पोहोचेल. या गाडीला वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, अमळनेर, नंदुरबार, सूरत, भरूच, बडोदा, आनंद, अहमदाबाद, सुरेंद्रनगर येथे थांबा राहील.
गाडी क्रमांक ०१२०८ डाउन राजकोट-नागपूर (मंगळवार) ३ फेºया आहेत. ही गाडी मंगळवार, २२ आॅक्टोबर रोजी २२ वाजता प्रस्थान करीत नागपूरला बुधवारी २२.१५ ला पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४१९ डाउन पुणे-नागपूर (शुक्रवार) ३ फेºया आहेत.
ही गाडी शुक्रवार, १८ आॅक्टोबर रोजी २१.३० वाजता प्रस्थान करीत नागपूरला शनिवारी १४.३० ला पोहोचेल. या गाडीला लोनावळा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा थांबा राहील. गाडी क्रमांक ०१४१९ अप नागपूर-पुणे (रविवार) ३ फेºया आहेत. रविवार, २० आॅक्टोबर रोजी १६.०० वाजता प्रस्थान करून ही गाडी पुणे येथे सोमवारी पोहोचेल.
गाडी क्रमांक ०८६१० डाउन लोकमान्य टिळक टर्मिनस-हटिया (बुधवार)ला ५ फेºया आहेत. ही गाडी शुक्रवार, ४ आॅक्टोबर रोजी ७.५५ ला प्रस्थान करून शनिवारी १७.३० वाजता हटिया येथे पोहोचेल. या गाडीला कल्याण, इगतपुरी, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगडा, राउलकेला येथे थांबा राहील. गाडी क्रमांक ०८६०९ अप हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस (बुधवार) ५ फेºया आहेत. ही गाडी बुधवार, २ आॅक्टोबर रोजी १७.३५ वाजता प्रस्थान करीत लोकमान्य टिळक टर्मिनसला २३.५५ ला पोहोचेल.