संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सतर्क राहून लसीकरण गतिमान करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:24 AM2021-09-04T04:24:06+5:302021-09-04T04:24:06+5:30
अकोला : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी शासकीय रुग्णालय व आरोग्य विभागासह संबंधित यंत्रणानी सतर्क राहून, जिल्ह्यात ...
अकोला : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी शासकीय रुग्णालय व आरोग्य विभागासह संबंधित यंत्रणानी सतर्क राहून, जिल्ह्यात लसीकरण मोहीम गतिमान करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शुक्रवारी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कृती दल व तांत्रिक समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसू, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, महिला व बाल संगोपन अधिकारी डॉ. मनीष शर्मा, वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम.डी. अष्टपुत्रे, डॉ. नितीन अंभोरे, डॉ. जी. जी. राठोड, डॉ. दिनेश नैताम, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. अस्मिता पाठक आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला आळा घालण्यासाठी अधिक सतर्क राहून चाचण्या वाढविणे, लसीकरण वेगाने करणे, गर्दीच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करणे यासारख्या उपाययोजना तातडीने राबवून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन त्यांना प्राधान्याने लसीकरण करावे याकरिता लसीकरण केंद्र वाढवून गर्दीच्या ठिकाणी व ग्रामीण भागात कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
..............फोटो................