कृषी उद्योग निर्माण करण्यावर ‘आत्मा’चा भर!

By admin | Published: December 16, 2014 12:57 AM2014-12-16T00:57:14+5:302014-12-16T00:57:14+5:30

उद्योग उभारणीसाठी शेतक-यांना मिळणार अर्थसहाय्य

'Spirit' emphasizes the creation of agriculture industry! | कृषी उद्योग निर्माण करण्यावर ‘आत्मा’चा भर!

कृषी उद्योग निर्माण करण्यावर ‘आत्मा’चा भर!

Next

अकोला : शेतकर्‍यांमधून कृषी उद्योजक निर्माण करण्यावर कृषी तंत्रज्ञान व्यवसाय यंत्रणेने (आत्मा) भर दिला असून, कृषी उद्योग टाकण्यासाठी शेतकर्‍यांना अर्थसहाय्य दिले जाणार आहे.
राज्यातह्यआत्माह्णकडून जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. पीक उत्पादन आणि उत्पादकता वाढ व वाढीव बाजाराच्या संधी, हे या प्रकल्पाचे मूळ उद्दिष्ट आहे. याच प्रकल्पाच्या माध्यमातून २0१४-१५ मध्ये कृषी उद्योजकता विकास योजना सुरू करण्यात आली आहे. या विकास कार्यक्रमांतर्गत कृषी उद्योजक गट, या प्रकल्पांतर्गत कार्यक्षेत्रातील शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांना या योजनेतून कृषी उद्योग प्रकल्प सुरू करता येणार आहेत. या गट, कंपन्या आणि संस्थांना काढणीपश्‍चात तंत्रज्ञान व्यवस्थापन, धान्य व फळेविषयक प्रकल्प, मूल्यवर्धन व प्रक्रिया, प्रतवारी व पणन प्रकल्प, कृषी मूल्यवर्धन यांत्रिकीकरण प्रकल्प, कृषी व्यवसाय प्रोत्साहन उपक्रम, बाजाराभिमुख सेंद्रिय कृषी उत्पादन, प्रतवारी व पणन प्रोत्साहन प्रकल्प, या विविध प्रकल्पांसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या प्रकल्पाकरिता अहवाल व प्रस्ताव तयार करण्याची गरज असून, या कृषी उद्योजकता प्रस्तावातील उभारणीसाठी लागणार्‍या केवळ मशिनरी व उपकरणांनाच अर्थसहाय्य दिले जाणार आहे. मशिनरी व उपकरणे यावरील खर्चाच्या ५0 टक्के किंवा जास्तीत जास्त दहा लाख एवढे अनुदान दिले जाणार आहे. या प्रकल्पाला कि मान सहा वर्ष यशस्विरीत्या चालविणे बंधनकारक आहे. गट, संस्था आणि कंपनी असलेल्या लाभार्थींनी या प्रकल्पांना पूर्वसंमती मिळावी यासाठी अर्ज करावे लागणार आहेत. हे अर्ज प्रकल्प संचालक , आत्मा कार्यालय, अकोला येथे उपलब्ध आहेत.

Web Title: 'Spirit' emphasizes the creation of agriculture industry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.