बाल संस्कार शिबिरास बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2017 02:14 PM2017-05-08T14:14:22+5:302017-05-08T14:14:22+5:30

मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालयात सुरु असलेल्या वीस दिवसीय बालसंस्कार शिबिरास बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Spontaneous response of children to Child Sanskar Camp | बाल संस्कार शिबिरास बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बाल संस्कार शिबिरास बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

अकोला-संत ज्ञानोबा तुकाराम बहुद्देशीय सेवा समितीच्या वतीने जुन्या शहरातील मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालयात सुरु असलेल्या वीस दिवसीय बालसंस्कार शिबिरास बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उमरी येथील टिळक राष्ट्रीय विद्यालयात गत सहा वर्षांपासून दरवर्षी आयोजित हे शिबीर यावर्षी पालकांच्या आग्रहाखातर जुन्या शहरातील मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालयात आयोजित करण्यात आले.
या वीस दिवसीय शिबिरात हभप ताकोते महाराज यांच्या नियंत्रणात भागवताचार्य शिवाजी महाराज मानकर,कृष्णा महाराज घोडके,हभप शरद महाराज पाटील,हभप गोपाळ महाराज ताथोड,निवृत्ती महाराज मानकर,हभप दिलीप महाराज खोबऱखेडे,सुभाष ढोले, डॉ.सुभाष लव्हाळे,गजानन धरमकर ,शिवाजी चौहान, सुभाष ढोले,डॉ. सतीश उटांगळे, पुरुषोत्तम वैराळे,प्रशांत पिसे आदी तज्ज्ञ मुलांना संस्कारांचे प्रशिक्षण देत आहेत. तर व्यवस्थापन मोहन ताथोड,रवींद्र आखरे,श्रीकांत दिवनाले,सूचित भटकर,सुभाष म्हैसने,हभप शिवाजी महाराज मानकर,हरिभाऊ दांदळे,सौ. मंगला म्हैसने व महिला वर्ग करीत आहेत . या वीस दिवसीय संस्कार शिबिरात बालकांना नैतिक आचरण,दोनशे संस्कृत श्लोक,मृदूंग ,टाळ ,वीणा वादन,गायन ,प्राणायाम व योगासन आदी संस्कार नित्य सकाळपासून तो रात्रीपर्यंत शिकविण्यात येत आहेत.समारोप हा दि.२३ मे रोजी मोठ्या भक्तिभावात होणार आहे.

Web Title: Spontaneous response of children to Child Sanskar Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.