मोफत गाळ वितरणास शेतकºयांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

By admin | Published: March 18, 2017 03:26 PM2017-03-18T15:26:05+5:302017-03-18T15:26:05+5:30

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत धानोरा बु.येथे शुक्रवारपासून नाला व तलावाचे खोलीकरण, गाळ उपसा व मोफत गाळ वाटप उपक्रम राबविण्यात येत आहे.

The spontaneous response of farmers to free sludge distribution | मोफत गाळ वितरणास शेतकºयांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

मोफत गाळ वितरणास शेतकºयांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Next

मूर्तिजापूर : शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आमदार हरीश मारोतीआप्पा पिंपळे यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील धानोरा बु.येथे शुक्रवारपासून नाला व तलावाचे खोलीकरण, गाळ उपसा व मोफत गाळ वाटप उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला शेतकरी बांधवांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी अभियंता जि.प.सुरळकर , सुधाकर चव्हाण, नामदेवराव चव्हाण हे विशेष परिश्रम घेत असून,त्यांना गावकऱ्र्यांचे सहकार्य मिळत आहे. या नाला व तलावाचे खोलीकरण, गाळ उपसा व मोफत गाळ वाटप कार्यक्रमाचा लाभ शेतकरी बांधवांनी घेत धानोरा(बु.) येथून मोफत गाळ नेऊन शेतात टाकावा व शेताला सुपीक बनवावे असे आवाहन आमदार हरिष पिंपळे यांनी या कार्यक्रमात केले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The spontaneous response of farmers to free sludge distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.