फैशनव्या प्रदर्शनीला उत्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:13 AM2021-02-05T06:13:31+5:302021-02-05T06:13:31+5:30
अकाेला : गेल्या १३ वर्षांपासून फॅशनच्या क्षेत्रात लाैकिक कायम ठेवणाऱ्या मुंबई येथील फैशनिस्टा फैशन ॲनड लाइफ स्टाइल एग्जिबिशन' ...
अकाेला : गेल्या १३ वर्षांपासून फॅशनच्या क्षेत्रात लाैकिक कायम ठेवणाऱ्या मुंबई येथील फैशनिस्टा फैशन ॲनड लाइफ स्टाइल एग्जिबिशन' अंतर्गत कंपनी 'फैशनव्या' हे विवाहासाठी लागणारे साहित्य तसेच विविध प्रकारच्या फॅशनची विशेष प्रदर्शनी अकाेल्यात आयाेजित केली हाेती २६ व २७ जानेवारी राेजी महिलांचा उदंड प्रतिसाद मिळालेल्या या प्रदर्शनचे उद्घाटन अकाेल्याच्या महापाैर अर्चना मसने यांच्या हस्ते झाले. यावेळी संजना टाेपीवाला, प्रियंका टाेपीवाला, कार्यकारी संचालक व अभिनेते पवन शंकर, आयाेजक अखिलेश पाण्डेय, विनाेद रजक आदी उपस्थित हाेते. महापाैर अर्चना मसने यांनी प्रदर्शनीचे फीत कापून उद्घाटन केले तसेच विविध स्टाॅलला भेट देऊन दागिने कपडे यांची माहिती घेतली. अतिशय सुबक तसेच विविध प्रकारची आभूषणे व कपडे एकाच छताखाली विक्रीसाठी उपलब्ध असल्याने महिलांसाठी खरेदीची पर्वणी असल्याचे त्या म्हणाल्या, या प्रदर्शनीच्या माध्यमातून फॅशनच्या जगतात नावलाैकिक असणाऱ्या कलावंतांचे काम अकाेलावासियांना प्रत्यक्ष अनुभवायाला मिळते. याबाबत त्यांनी समाधान व्यक्त कले. यावेळी आयाेजक पवन शंकर आणी विनाेद रजक यांनी महापाैर यांना विविध स्टाॅलची माहिती दिली. दाेन दिवस चाललेल्या या प्रदर्शनीमध्ये देशातील विख्यात फॅशन डिजाइनर्स तसेच देशातील दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगलौर, आगरा, कानपूर, भोपाल, जयपूर, इंदौर, पुणे, जालना आणि गोंदियामधील डिजाइनर्स प्रदर्शिनीमध्ये सहभाग घेतला. या प्रदर्शनीत विविध प्रकारचे अत्यानुधिक वस्त्र , परिधान, आभूषण, लेटेस्ट वेस्टर्न वियर, घरच्या सजावटीचे विविध साहित्य पारंपरिक वस्र, पादत्राणे आदींचा समाेवश हाेता.
बाॅक्स....फैशनिस्टा कम्पनीद्वारे २००८ पासून ३६ शहरांमध्ये प्रदर्शनीचे आयाेजन केलेले आहे. आतापर्यंत २५० प्रदर्शनी आयाेजित करणाऱ्या फैशनिस्टा या कपंनीला २०१८ आणि २०१९ मध्ये देशातील सर्वश्रेष्ठ फैशन कम्पनीचा "राष्ट्रस्तरीय सम्मान" मिळाला आहे तसेच फैशनिस्टा ने २०१९ मध्ये सर्वात जास्त शहरांमध्ये प्रदर्शन आयाेजन करण्यासाठी सन्मानित करण्यात आली आहे.