‘गणेशा गीत’ आंतरशालेय गायन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:23 AM2021-09-17T04:23:58+5:302021-09-17T04:23:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : लोकमत बालविकास मंच आणि श्री समर्थ पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशा गीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : लोकमत बालविकास मंच आणि श्री समर्थ पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशा गीत आंतरशालेय गायन स्पर्धेचे १६ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. आपल्या सर्वांकडे बाप्पा विराजमान झाले आहेत, त्याच अनुषंगाने ही आंतरशालेय गीत गायन स्पर्धा गणपती बाप्पांवर आधारित गाण्यांची आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून श्री समर्थ एज्युकेशनचे संचालक प्रा. नितीन बाठे, लोकमत अकोला आवृत्तीचे युनिट हेड आलोक कुमार शर्मा, आशू एजन्सीचे संचालक श्याम सारबुकन, श्री समर्थ पब्लिक स्कूल कॅम्पस १ च्या मुख्याध्यापिका स्वर्णा गुप्ता तसेच श्री समर्थ पब्लिक स्कूल कॅम्पस २ च्या मुख्याध्यापिका अनिता श्रीवास्तव तसेच स्पर्धेचे परीक्षक म्हणून संगीत विशारद, राजश्री देशपांडे त्याचबरोबर सप्तक म्युझिक क्लासचे संचालक, प्रमोद राऊत उपस्थित होते. ही गीत गायन स्पर्धा गट पहिला ५ वी ते ७ वी आणि गट दुसरा ८ वी ते १० वी अशा दोन गटांमध्ये आयोजित करण्यात आली होती. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत ही स्पर्धा श्री समर्थ पब्लिक स्कूल, रणपिसे, नगर, अकोला येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धा बाप्पाच्या गाण्यांवर आधारित असल्याकारणाने चिमुकल्यांनी सुंदर गाणी म्हणून स्पर्धेला रंगत आणली. आंतरशालेय गीत गायन स्पर्धेचा समारोप बक्षीस वितरणाने करण्यात आला. आंतरशालेय गीत गायन स्पर्धेमध्ये विविध शाळांनी सहभाग नोंदवून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कोरोनामुळे अनेक दिवसांपासून मुले घरात असल्याकारणाने त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या अनुषंगाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मुलांनी सुंदर गाणी म्हणून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि लोकमत बालविकास मंच नेहमीच असे नवनवीन उपक्रम आयोजित करीत असते. त्यांना नेहमीच श्री समर्थ पब्लिक स्कूलचे सहकार्य लाभेल.
- प्रा. नितीन बाठे,
संचालक, श्री समर्थ एज्युकेशन, अकाेला
लोकमत बालविकास मंच आणि श्री समर्थ पब्लिक स्कूल यांच्या संकल्पनेने मुलांच्या आत्मविश्वासाला, सुप्त गुणांना वाव मिळाला आहे. एवढेच म्हणेन की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. स्पर्धकांनी नियमित गायनाचा रियाज करावा आणि अजून नवीन जोमाने तयारी करावी आणि अशा स्पर्धेत भाग घेत राहावा.
- राजश्री देशपांडे (परीक्षक)
कुठलीही व्यक्ती प्रथमतः विद्यार्थीच असते. त्या विद्यार्थ्याने अथक परिश्रम घेऊन तो पूर्णत्वाला पोहोचतो. कुठलीही गोष्ट करण्यासाठी धाडस करावे लागते. या चिमुकल्यांची धाडसी वृत्ती पाहून मला माझी विद्यार्थीदशा आठवली. लोकमत बालविकास मंच आणि श्री समर्थ पब्लिक स्कूल यांनी असेच नवनवीन उपक्रम आयोजित करावे आणि मुलांच्या कलागुणांना वाव द्यावा.
- प्रमोद राऊत (परीक्षक)
गट ५ वी ते ७ वी-
- प्रथम पारितोषिक- श्रेया हिवरकर- श्री समर्थ पब्लिक स्कूल कॅम्पस-२
- द्वितीय पारितोषिक कृती लढ्ढा श्री समर्थ पब्लिक स्कूल कॅम्पस-१
- तृतीय पारितोषिक- ज्ञानदा चापके- बाल शिवाजी प्राथमिक शाळा
- उत्तेजनार्थ पारितोषिके-
१) श्रेयसी फुलझेले - स्कूल ऑफ स्कॉलर्स कौलखेड
२) श्रीकर लांडे -होली क्रॉस कॉन्व्हेंट
गट ८ वी ते १० वी
- प्रथम पारितोषिक- स्वरश्री नागपूरकर- खंडेलवाल इंग्लिश प्रायमरी स्कूल
- द्वितीय पारितोषिक- अदिती खुणे - बाल शिवाजी माध्यमिक शाळा
- तृतीय पारितोषिक - ओजस महाजन- विवेकानंद प्रायमरी स्कूल
- उत्तेजनार्थ पारितोषिके-
१) स्वराली चापके -प्रभात किड्स स्कूल
२) श्रुतिका वानरे - मोहरीदेवी खंडेलवाल कन्या महाविद्यालय