भारत बंदला तेल्हाऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:14 AM2020-12-09T04:14:59+5:302020-12-09T04:14:59+5:30
अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंगळवारी देशव्यापी भारत बंदला तेल्हारा शहरामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने बंद ...
अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंगळवारी देशव्यापी भारत बंदला तेल्हारा शहरामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी राजकीय पक्षांसह सामाजिक संघटना व शेतकरी बांधवसुद्धा रस्त्यावर उतरले होते. यावेळी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या कृषी धोरणाच्या व सदर कायद्याच्या विरोधात निदर्शने करून सदर कृषी कायदे रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली. यावेळी तेल्हारा शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहारसुद्धा बंद होते. या बंदमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, लोकजागर आघाडी आदी राजकीय पक्षांसह सामाजिक संघटना, शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला होता. या बंदमध्ये प्रा. प्रदीप ढोले, मोहम्मद सलीम, प्रकाश वाकोडे, सोनू मलिये, डॉ. अशोक बिहाडे, अनिल गावंडे, विक्रांत शिंदे, पप्पू शेठ सोनटक्के, प्रा. सचिन थाटे, रामभाऊ फाटकर, अशोक दारोकार, विकास पवार, सुधाकर येवले, रवि बिहाडे, सूरज खारोडे, हुकूमचंद शर्मा, संदीप खारोडे, अन्सार पटेल, प्रमोद गावंडे, विवेक खारोडे, चंद्रकांत मोरे, दिलीप पिवाल, गोपाल जळमकार, मंगेश घोंगे, अनंत सोनमाळे, श्रीकृष्ण वैतकार, विजय जायले, ज्ञानेश्वर मार्के, पुरुषोत्तम मानकर, रतन गव्हांदे, सतीश मामनकार आदी पदाधिकारी उपस्थित होते. बंदमध्ये तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य खरेदी-विक्री बंद होती. यावेळी सभापती पुरुषोत्तम पाथ्रीकर, उपसभापती अरविंद अवताडे व सर्व संचालक मंडळ तसेच मापारी तोलारी व्यापारी यांनी बंदला जाहीर पाठिंबा देत सर्व व्यवहार बंद ठेवले.
फोटो: