स्पोर्ट बुक स्पर्धेचे बक्षीस वितरण
By admin | Published: July 5, 2014 10:37 PM2014-07-05T22:37:37+5:302014-07-05T23:43:10+5:30
लोकमत : संस्काराचे मोती
खामगाव : लोकमत तर्फे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरीता गतवर्षी धमाल स्पर्धा स्पोर्ट्स बुक चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत क्रिडाजगताची धमाल घरबसल्या अनुभवा अशी आगळी वेगळी स्पर्धा इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांंकरीता आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता नॅशनल हायस्कुलच्या प्रांगणात पार पडला.
या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस पियानो, द्वितीय बक्षीस ट्रॉली बॅग, तृतीय बक्षीस बॅडमिंटन सेट व या व्यतिरीक्त प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांंस हमखास आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असुन यामध्ये स्थानिक श्री अरजण खिमजी नॅशनल हायस्कुलमधून या विद्यालयातील विद्यार्थी प्रसाद संतोष गोडाळे वर्ग ७ वा (अ) या विद्यार्थ्यांंला प्रथम बक्षीस पियानो शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रविणा शाह यांच्या हस्ते देण्यात आले. द्वितीय बक्षीस ट्रॉली बॅग कु.दिव्या रमेश कळमकर वर्ग ७ वा (अ) या विद्यार्थीनी मिळाले तर तृतीय बक्षीस प्रथमेश राजेश महाडिक वर्ग ६ वा (क) या विद्यार्थ्यांंला देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सौ. प्रविणा शाह, उपमुख्याध्यापक श्रीराम गव्हांदे यांच्यासह शाळेतील शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये श्री अरजण खिमजी नॅशनल हायस्कूल या शाळेतील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यालयातील विद्यार्थ्यांंकडून या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला होता.