सिंचन विहिरी घोटाळ्याची ‘ऑन द स्पॉट’ चौकशी सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 11:12 AM2019-12-20T11:12:23+5:302019-12-20T11:12:39+5:30

घोटाळ्यासाठी जबाबदार धरून तत्कालीन अधिकारी-कर्मचाºयांना १ ते ४ मुद्यांचे स्पष्टीकरण मागविणारे दोषारोपपत्र बजाविण्यात आले.

 'On the spot' inquiry into irrigation wells scam begins! | सिंचन विहिरी घोटाळ्याची ‘ऑन द स्पॉट’ चौकशी सुरू!

सिंचन विहिरी घोटाळ्याची ‘ऑन द स्पॉट’ चौकशी सुरू!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : धडक सिंचन विहिरी योजनेच्या लक्ष्यांकापेक्षा अधिक विहिरींना मंजुरी दिल्याप्र्रकरणी ग्रामपंचायतनिहाय संपूर्ण माहिती सादर करण्याचा आदेश शासनाने दिल्यानंतर त्या दोन्ही तालुक्यांतील विहिरी वाटपाची ‘ऑन द स्पॉट’ चौकशी सुरू झाली आहे. प्रत्येक शेतात जाऊन विहिरींची पडताळणी केली जात आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणी लाखो रुपयांचा मलिदा लाटणाऱ्या बाळापूर, पातूर पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकाऱ्यांसह एकूण ५१ जणांवर दोषारोपपत्र बजावण्यात आले. त्यांच्या स्पष्टीकरणाबाबतही अनभिज्ञता व्यक्त केली जात आहे.
बाळापूर तालुक्यात सिंचन विहिरींसाठी ६४५ लक्ष्यांक असताना ९२४ लाभार्थींना मंजुरी आदेश देण्यात आला. पातूर तालुक्यातही तोच प्रकार घडल्याचे पुढे आले. अनेक गावांतील लक्ष्यांकाची पूर्तीही झाली नाही. त्यामुळे लक्ष्यांकापेक्षा अधिक विहिरींना तांत्रिक, प्रशासकीय मंजुरी देणारे तत्कालीन गटविकास अधिकारी, शाखा अभियंता, संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिले होते. चौकशी अहवालानंतर त्यामध्ये सहभाग असणाºया अधिकारी-कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. त्यानंतर या घोटाळ्यासाठी जबाबदार धरून तत्कालीन अधिकारी-कर्मचाºयांना १ ते ४ मुद्यांचे स्पष्टीकरण मागविणारे दोषारोपपत्र बजाविण्यात आले. त्यामध्ये बाळापूर, पातूर पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी असे प्रत्येकी पाच अधिकारी, तर ग्रामसेवकांमध्ये अनुक्रमे २३ आणि १८ जणांचा समावेश आहे. त्या सर्वांना दोषारोपपत्र बजाविण्यात आले. त्यानंतर विहिरींची संपूर्ण माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने मागविली. तसेच या घोटाळ्याचा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनातही उपस्थित झाल्याने विभागीय आयुक्तांनी स्वतंत्र पथकांमार्फत या विहिरींच्या चौकशीचा अहवाल मागविला. त्यासाठी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांवर जबाबदारी देण्यात आली. अभियंते प्रत्येक शेतात जाऊन विहिरींच्या सद्यस्थितीची माहिती घेत पडताळणी अहवाल तयार करीत आहेत. हा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनीही आधीच दोन्ही तालुक्यांतील लाभार्थींच्या संपूर्ण माहितीसह शेती, योजनेंसदर्भातील २० मुद्यांची माहिती मागविली होती. ती प्राप्त झालेली नाही. त्यानंतर आता पडताळणी अहवालच तयार केला जात आहे.

Web Title:  'On the spot' inquiry into irrigation wells scam begins!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.