वणी रंभापूर येथे ग्रा.पं.मार्फत गावात फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:17 AM2021-05-23T04:17:30+5:302021-05-23T04:17:30+5:30
गाव निर्जंतुकीकरणासाठी केली फवारणी वणी रंभापूर येथील ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम गाव निर्जंतुकीकरणासाठी केली फवारणी वणी रंभापूर : कोरोनाच्या ...
गाव निर्जंतुकीकरणासाठी केली फवारणी
वणी रंभापूर येथील ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
गाव निर्जंतुकीकरणासाठी केली फवारणी
वणी रंभापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोविड-१९ या संसर्गजन्य आजारामुळे शासनाने संचारबंदी कडक लागू केली असून, जिल्ह्यातील ५४ गावांत नुकतेच सीमा बंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. ‘माझे गाव, माझी जबाबदारी’अंतर्गत अकोला पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम वणी रंभापूर राजापूर येथे सरपंच रमा सरकटे यांच्या पुढाकाराने गावात सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी नुकतीच करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात सर्वप्रथम ऑटोवर स्पीकरमधून जनजागृती करण्यात आली आहे. गाव कोरोनामुक्त करण्यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत समन्वय साधत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करता येईल, यासाठी वणी रंभापूर येथील सामाजिक कार्यकर्ते अग्रेसर असतात. गावाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी धनंजय सरकटे, ग्रामपंचायत सदस्य चंदा वानखडे, कावेरी हरणे, राहुल वानखडे, रंजना दीपक महल्ले, योगेश बोदडे, नयनाताई वानखडे, मनोज हागे, संतोष इंगळे, संदीप सरदार यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी अहमद खान, बाळकृष्ण सोळंके यांनी परिश्रम घेतले.