चिपळूण येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पथक रवाना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:19 AM2021-07-29T04:19:41+5:302021-07-29T04:19:41+5:30
मूर्तिजापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील रायगड,, चिपळूण या भागांत नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक कुटुंबे उघड्यावर आली ...
मूर्तिजापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील रायगड,, चिपळूण या भागांत नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. त्यामुळे सामाजिक बांधीलकी जपत कमलाकर गावंडे यांच्यासह कुरणखेड येथील माँ चंडिका आपत्कालीन पथकाने पुढाकार घेत रत्नागिरी, चिपळूण भागांतील लोकांना मदतीसाठी हे पथक मंगळवारी रवाना झाले आहे.
कोल्हापूर येथील सिद्धगिरी कनेरी मठ यांच्या माध्यमातून चिपळूण, रायगड परिसरातील पूरग्रस्त भागात माँ चंडिका आपत्कालीन पथक सेवाकार्य राबविणार आहे. यासाठी मूर्तिजापूरच्या नगराध्यक्षा मोनाली गावंडे, भाजपचे शर्माजी, प्रमोद गोगटे, किरण उमाळे, नितीन भटकर यांनी पथकाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. आपत्कालीन पथक पाठविण्यासाठी कमलाकर गावंडे यांचे सहकार्य लाभले आहे. चंडिकामाता आपत्कालीन बचाव पथकाचे प्रमुख रंजित घोगरे, योगेश विजयकर, वीरेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात महेश वाघमारे, शेखर भदे, उज्ज्वल कांबे, आकाश मुढाले, अनिकेत खंडारे, तुषार अढाव हे मदतकार्यासाठी रवाना झाले आहे.