वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्रीमुक्ती परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:14 AM2020-12-27T04:14:12+5:302020-12-27T04:14:12+5:30
जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती यांच्या निवासस्थानी आयाेजित या परिषदेच्या अध्यक्षस्थानी वंदना वासनिक या होत्या परिषदेचे उद्घाटन प्रदेश ...
जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती यांच्या निवासस्थानी आयाेजित या परिषदेच्या अध्यक्षस्थानी वंदना वासनिक या होत्या परिषदेचे उद्घाटन प्रदेश महासचिव अरुंधतीताई शिरसाट यांचे हस्ते झाले. यावेळी प्रमुखवक्त्या शेगावच्या नगरसेविका प्रीती शेगोकार यांनी महिलांना मार्गदर्शनात यावेळी माणतोष मोहोळ, सुवर्णा जाधव, किरण बोराखळे या होत्या. कार्यक्रमाचे संचालन प्रीती भगत यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणतोष मोहोळ यांनी केले. यावेळी सारला मेश्राम, संगीता खंडारे, प्रतिभा नागदेवते, मय इंगळे, सुनंदा चांदणे, हिना चौधरी, शीतल राऊत, सुनीता रंगारी, कल्पना वसू, शीतल अंभोरे, द्वारकाबाई शिरसाट, सुनंदा धडसे, रेखा गवई, शालू नाईक, मनकर्णा इंगळे, मेघा शिराळे, सरोज वाकोडे, शारदा सोनोने, पंचफुला मोरे आदी उपस्थित हाेत्या. स्रीमुक्ती परिषदमध्ये मनोरमाताई गवई, किरण डोंगरे, किरण बोराखडे या कोविड योद्धांचा सत्कार करण्यात आला, हलाकीच्या परिस्थितीतून उच्च पदावर पोहोचणाऱ्या महिला प्रीती लहाने, ॲड. मीनल मेंढे, श्रुष्टी कांबळे, तर बॉक्सिंगमध्ये पारितोषिक मिळवणारी ऋषाली डोंगरे यांचे सत्कार करण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संगीता रयबोले यांनी केले
बाॅक्स
असे झाले या परिषदेमध्ये ठराव
कृषीविरोधी कायदे रद्द करा
कामगारविरोधी विधेयके मागे घ्या.
शैक्षणिक शुल्क निश्चित करावे.
शिष्यवृत्ती वाढायलाच हवी.
ड्रेस कोड अनावश्यक आहे.
शक्ती विधेयकाला विरोध.
एक सदस्य बोर्ड पद्धतच हवी .
इंधन दरवाढ कमी करावी.
हाकर्स प्रकरणाचा निषेध.
ऊसतोड महिलांना त्यांच्या कष्टाच्या प्रमाणात वेतन दिले जावे.