एसटी बस व कारची समोरासमोर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 07:47 PM2017-10-11T19:47:08+5:302017-10-11T19:47:37+5:30

मूर्तिजापूर : येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर एका रेस्टॉरंटसमोर  अकोल्यावरून येत असलेली एम.एच. २0 बीसी ८३१३  क्रमांकाची कार आणि मूर्तिजापूर येथून शेगावकडे जात  असलेली  एमएच ४0 वाय ५७३९ क्रमांकाची कारंजा  आगाराची कारंजा-शेगाव एसटी बसची ११ ऑक्टोबर रोजी  समोरासमोर जबर धडक झाल्याने, कारमधील रबर कंपनीचे  दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. 

The ST bus and the car hit face to face | एसटी बस व कारची समोरासमोर धडक

एसटी बस व कारची समोरासमोर धडक

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर एका रेस्टॉरंटसमोर घडला अपघातजबर धडक : कारमधील दोन जण जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर एका रेस्टॉरंटसमोर  अकोल्यावरून येत असलेली एम.एच. २0 बीसी ८३१३  क्रमांकाची कार आणि मूर्तिजापूर येथून शेगावकडे जात  असलेली  एमएच ४0 वाय ५७३९ क्रमांकाची कारंजा  आगाराची कारंजा-शेगाव एसटी बसची ११ ऑक्टोबर रोजी  समोरासमोर जबर धडक झाल्याने, कारमधील रबर कंपनीचे  दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. 
या अपघातात कारच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला.  घटनास्थळी मूर्तिजापूर शहर पोलीस, मूर्तिजापूर आगारप्रमुख  अंबुलकर व विजय साबळे यांनी भेट दिली. वृत्त लिहिपर्यंत या  अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पुढील त पास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहेत. दोन्ही किरकोळ  जखमींवर स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात  आले; परंतु जखमींची नावे मिळू शकली नाहीत. 

Web Title: The ST bus and the car hit face to face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.