उपाहार करण्यासाठी चालक-वाहकाने एसटी बस तासभर थांबविली; प्रवाशांसह आजारी महिला ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 04:28 PM2018-06-23T16:28:21+5:302018-06-23T16:38:41+5:30

बोरगाव वैराळे (जि. अकोला): अकोला येथून बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे व धामना येथे जाणारी बस चालक व वाहक यांनी कर्तव्यावर असताना हातरुण येथे एका व्यक्तीच्या घरी उपाहार करण्यासाठी चक्क तासभर थांबवून ठेवल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवार, २३ जून रोजी घडला.

ST bus stopped for lunch; The sick woman with the passengers waiting | उपाहार करण्यासाठी चालक-वाहकाने एसटी बस तासभर थांबविली; प्रवाशांसह आजारी महिला ताटकळत

उपाहार करण्यासाठी चालक-वाहकाने एसटी बस तासभर थांबविली; प्रवाशांसह आजारी महिला ताटकळत

Next
ठळक मुद्दे अकोला येथून सुटणारी एसटी बस वेळेवर सुटल्यानंतर ती हातरुण येथे सकाळी ८ वाजता पोहचली. हातरुण - बोरगाव वैराळे मार्गावरील हातरुण येथील एका व्यक्तीने एस टी क्रमांक एम एच ४०-९३२६ ला थांबवून चालक व वाहकाला उपाहार करण्यासाठी आपल्या घरी बोलावले.सकाळी आठ वाजता गेलेले चालक व वाहक तब्बल तासाभराने सकाळी नऊ वाजता परत आल्यानंतर बस बोरगाव वैराळे व धामनाकडे मार्गस्थ झाली.

बोरगाव वैराळे (जि. अकोला): अकोला येथून बाळापूर तालुक्यातील बोरगाव वैराळे व धामना येथे जाणारी बस चालक व वाहक यांनी कर्तव्यावर असताना हातरुण येथे एका व्यक्तीच्या घरी उपाहार करण्यासाठी चक्क तासभर थांबवून ठेवल्याचा संतापजनक प्रकार शुक्रवार, २३ जून रोजी घडला. चालक व वाहकाच्या मनमानीमुळे धामना, बोरगाव वैराळे येथे जाणारे बसमधील प्रवासी व अकोला येथे जाण्यासाठी वाट पाहत असलेल्या हातरुण येथील एका आजारी महिलेला ताटकळत बसावे लागले.
अकोला- निमकर्दा - हातरुण - बोरगाव वैराळे - धामणा ही सकाळी ७ वाजता अकोला येथून सुटणारी एसटी बस वेळेवर सुटल्यानंतर ती हातरुण येथे सकाळी ८ वाजता पोहचली. सदर बस धामनाकडे जाण्यास निघाली असता हातरुण - बोरगाव वैराळे मार्गावरील हातरुण येथील एका व्यक्तीने एस टी क्रमांक एम एच ४०-९३२६ ला थांबवून चालक व वाहकाला उपाहार करण्यासाठी आपल्या घरी बोलावले. बसचे चालक व वाहक हे दोघेही कर्तव्यावर असल्याचे भान न ठेवता चक्क बस रस्त्यावर थांबवून त्या व्यक्तीच्या घरी उपाहार करण्यासाठी गेले. यावेळी बसमध्ये धामना व बोरगाव वैराळे येथे जाणारे आठ ते दहा प्रवासी होते. सकाळी आठ वाजता गेलेले चालक व वाहक तब्बल तासाभराने सकाळी नऊ वाजता परत आल्यानंतर बस बोरगाव वैराळे व धामनाकडे मार्गस्थ झाली. तोपर्यंत बसमधील प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. सदर बस धामना येथून परत हातरुण मार्गे परत अकोला येथे जाते. सकाळी या बसशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे ती परत येईपर्यंत हातरुण येथील प्रवासीही बसची वाट पाहत ताटकळत होते. यामध्ये हातरुण येथील हेलगे कुटुंबातील आजारी महिलेलाही प्रवासी निवाऱ्यावर ताटकळत बसावे लागले. आपले नेमून दिलेल्या कामात दिरंगाई करणाº्या वाहक व चालकावर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

अकोला-बोरगाव वैराळे-धामणा बस घेऊन जाणाऱ्या चालक व वाहकाने आपल्या कामात दिरंगाई करीत वैयक्तिक कामासाठी प्रवाशांना ताटकळत ठेवल्याचा प्रकार चुकीचा आहे.याबाबत माहिती घेऊन संबंधित वाहक व चालकावर कारवाई करण्यात येईल. - आर. डी. येवले, आगार व्यवस्थापक, अकोला आगार क्र. २, अकोला

Web Title: ST bus stopped for lunch; The sick woman with the passengers waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.