एसटीच्या वाहकांना अग्रधनापोटीही सुटे पैसे नाहीच!
By admin | Published: April 26, 2016 02:06 AM2016-04-26T02:06:47+5:302016-04-26T02:06:47+5:30
सुट्या पैशांची डोकेदुखी : प्रवासी व वाहकांचे उडताहेत खटके.
राम देशपांडे /अकोला
प्रवासादरम्यान वाहकाजवळ सुटे पैसे असावेत म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने कर्तव्यावर जाणार्या प्रत्येक वाहकाला ह्यअग्रधनह्ण म्हणून १00 रुपये दिले जातात. वास्तविक पाहता प्रशासनाने हे अग्रधन सुट्या पैशाच्या स्वरूपात देणे अपेक्षित आहे; मात्र महामंडळाला कायम सुट्या पैशांची चणचण भासत असल्याने, १00 रुपयांच्या नोटा देऊन वाहकांची बोळवण केली जाते. परिणामी प्रवासादरम्यान प्रवासी आणि वाहकांमध्ये खटके उडतात. ज्या बँकांमध्ये दिवसभराचे लाखोचे उत्पन्न जमा केले जाते, त्या बँकासुद्धा महामंडळाला सुटे पैसे देण्यास असर्मथ ठरत असल्याचे चित्र रापमच्या अमरावती परिमंडळात पाहावयास मिळत आहे.
घरातून बाहेर पडताना अनेक जण खिशात थोडेफार सुटे पैसे बाळगतात. नसल्यास, ही कमतरता अनेकदा घरातील ज्येष्ठ मंडळी भरून काढतात. याच प्रथेला अनुसरून, कर्तव्यावर निघालेल्या वाहकांना एसटी महामंडळाकडून ह्यअग्रधनह्ण म्हणून प्रत्येकी शंभर रुपये दिले जातात. प्रवासभाडे आकारताना वाहकास सुट्या पैशांची अडचण भासू नये, याकरिता एसटी महामंडळाने ही प्रथा सुरू केली. पूर्वी प्रत्येक वाहकास सुट्या पैशांच्या स्वरूपात १0 रुपये दिले जायचे. काळानुरूप बदल करून प्रत्येक वाहकास महामंडळाकडून १00 रुपये दिले जातात. वास्तविक पाहता, एसटी महामंडळाने ही रक्कम प्रत्येक वाहकास सुट्या पैशांच्या स्वरूपातच देणे अपेक्षित आहे; मात्र सुट्या पैशांची चणचण हा कळीचा मुद्दा ठरत असल्याने, शंभराची नोट देऊन प्रत्येक वाहकाची बोळवण केली जात आहे. परिणामी प्रवासादरम्यान प्रवासी आणि वाहकांमध्ये सुट्या पैशांवरून वाद निर्माण होत आहेत.