कोरोना काळातील ‘त्या’ प्रोत्साहन भत्त्यापासून एसटीचे चालक-वाहक अद्यापही वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:19 AM2021-03-17T04:19:05+5:302021-03-17T04:19:05+5:30
गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये हजारो प्रवाशी जिल्ह्याच्या गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर अडकले होते. कोरोनाकाळात परराज्यात जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष सुविधा ...
गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये हजारो प्रवाशी जिल्ह्याच्या गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर अडकले होते. कोरोनाकाळात परराज्यात जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष सुविधा केली होती. चालक-वाहकांनी या कठीण काळातही सेवा दिली. छत्तीसगड, तेलंगाना, मध्य प्रदेशातील नागरिकांना त्यांच्या गावी सोडले. यातील छत्तीसगड ८, मध्यप्रदेश ३, तेलंगाना २ बसेस सोडण्यात आल्या. अडकलेल्या प्रवाश्यांची संख्या जास्त असल्याने बसेस अहोरात्र सुरू होत्या. जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या चालक व वाहकांना शासनाने ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे जाहीर केले होते; मात्र वर्ष उलटले असताना सुद्धा या भत्त्यापासून चालक-वाहक वंचित आहे.
--बॉक्स--
३०० रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता
३५ कोरोनाकाळात जिल्ह्यातून परराज्यात एसटीच्या फेऱ्या झाल्या
३५ चालकांनी दिली कोरोनाकाळात सेवा
--कोट--
लॉकडाऊनच्या काळात परराज्यात एसटीच्या फेऱ्यांवर सेवा बजावणाऱ्या चालक-वाहकांना ३०० रुपये भत्ता अजूनही मिळालेला नाही. चालक-वाहकांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. यावर संयुक्त बैठकीत मुद्दा उपस्थित केला आहे.
रुपम वाघमारे, विभागीय सचिव, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना