कमी रजा घेणाऱ्या चालक, वाहकांचा होणार सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 04:34 PM2019-01-18T16:34:28+5:302019-01-18T16:38:03+5:30
वाशिम: राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कमी रजा घेणाºया आणि कमी गैरहजर राहणाºया चालक, वाहकांना सन्मानित करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कमी रजा घेणाºया आणि कमी गैरहजर राहणाºया चालक, वाहकांना सन्मानित करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यानुसार अकोला परिवहन विभागातील आगारस्तरावर कमी रजा घेणाºया कर्मचाºयांची यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एसटी महामंडळात जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ दरम्यान सर्वात कमी रजा घेणाºया आणि कमी गैरहजर राहणाºया चालक, वाहकांचा प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी विशेष सन्मान करण्याचे महामंडळाने ठरविले आहे. यासाठी ज्या वाहक, चालकांनी पूर्ण वर्षभराच्या कालावधीत कमीतकमी रजा व गैरहजेरी ठेवली आहे. अशा चालक, वाहकांची स्वतंत्र यादी तयार करण्यात येत असून, आगारातील एकूण चालक, वाहक संख्येच्या ५ टक्के प्रमाणात सर्वात कमी रजा व गैरहजेरी असणाºया चालक, वाहकांची निवड या सन्मानासाठी करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आगार व्यवस्थापकांच्या कक्षात यासाठी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, सर्वात कमी रजा घेतलेल्या चालक, वाहकांसोबत महामंडळाच्या उत्पन्न वाढीबाबत चर्चा करून त्यांच्या संकल्पनाही जाणून घेतल्या जाणार आहेत. यासाठी अकोला परिवहन विभागांतर्गत सर्वात कमी रजा घेणाºया व कमी गैरहजर राहणाºया चालक, वाहकांची यादी तयार करण्याच्या सुचना सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या असून, आगारस्तरावर याद्या तयार करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
महामंडळाच्या परिपत्रकानुसार सर्वात कमी रजा घेणाºया चालक , वाहकांची यादी तयार करण्याच्या सुचना आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत. येत्या २३ जानेवारीपूर्वी ही यादी सादर करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.
-स्मिता सुतवणे
विभागीय वाहतूक अधिकारी
रा.प.म. अकोला विभाग
सन्मान सोहळा