चालकांसाठी एसटीची मालवाहतूक बनली डोकेदुखी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:20 AM2021-05-27T04:20:26+5:302021-05-27T04:20:26+5:30
जिल्ह्यात एकूण एसटी ट्रक २५ वाहतूक सुरू असलेले ट्रक १५ ५०० रुपये मिळतात, पण ॲडव्हान्स माल वाहतुकीसाठी एसटीचा ट्रक ...
जिल्ह्यात एकूण एसटी ट्रक
२५
वाहतूक सुरू असलेले ट्रक
१५
५०० रुपये मिळतात, पण ॲडव्हान्स
माल वाहतुकीसाठी एसटीचा ट्रक घेऊन गेलेल्या चालकांना खर्चासाठी ५०० रुपये देण्यात येतात. मात्र, तेही ॲडव्हान्स मिळतात. हे पैसे पगारातून कापण्यात येतात.
संचारबंदीच्या काळात मालवाहतुकीसाठी गेलेल्या चालकांचे जेवणाचे हाल होत आहेत. जास्त दिवस बाहेरगावी जात असल्याने सुट्टीही घेण्याची अडचण येत नाही. या चालकांना २५०-३०० पर्यंत भत्ता करून द्यावा.
- रूपम वाघमारे, विभागीय सचिव, एसटी संघटना
महामंडळाकडून सूचना; मात्र अंमलबजावणी नाही!
एका विभागाच्या मालवाहतुकीचे वाहन अन्य विभागांत गेल्यास कर्मचाऱ्यांना २ दिवसांपेक्षा जास्त थांबवू नये, अशा सूचना असतानाही प्रत्यक्षात ४ ते ५ व त्यापेक्षा अधिक दिवस कर्मचाऱ्यांना थांबून राहावे लागते, तसेच त्या ठिकाणी राहण्याची व नाश्ता/जेवणाची व्यवस्था केली जात नाही.