‘एसटी’ही सुरू करणार मालवाहू सेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 12:32 PM2019-01-01T12:32:07+5:302019-01-01T12:32:26+5:30

अकोला : राज्यात प्रवासी वाहतूक सेवा देणारे एसटी महामंडळ उत्पन्न वाढीसाठी लवकरच मालवाहू सेवाही पुरविणार आहे. यासाठी जुन्या एसटी गाड्यांचा वापर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ST will start  Cargo service | ‘एसटी’ही सुरू करणार मालवाहू सेवा!

‘एसटी’ही सुरू करणार मालवाहू सेवा!

googlenewsNext

- प्रवीण खेते
अकोला : राज्यात प्रवासी वाहतूक सेवा देणारे एसटी महामंडळ उत्पन्न वाढीसाठी लवकरच मालवाहू सेवाही पुरविणार आहे. यासाठी जुन्या एसटी गाड्यांचा वापर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्य परिवहन महामंडळ सध्या आर्थिक तोट्यात चालत आहे. हा अनुशेष भरून काढण्यासाठी महामंडळ विविध उपाययोजनांवर भर देण्याचा प्रयत्न करीत आहे. यातीलच एक प्रयत्न म्हणजे मालवाहू सेवा सुरू करण्यासंदर्भात आहे. महामंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिवहन मंत्री मंडळामध्ये राज्यात एसटीची मालवाहू सेवा सुरू करणे विचाराधीन आहे. ही सेवा सुरू झाल्यास गावपातळीवर माल वाहतूक सेवेचे नेटवर्क पसरण्यास मदत होईल; परंतु प्रत्यक्षात ही सेवा कितपत यशस्वी ठरेल, यासंदर्भात साशंका व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी रेल्वे मालवाहू सेवेच्या धर्तीवर एसटीची सेवा सुरू झाल्यास ग्रासरूटवर माल वाहतुकीचे नेटवर्क तयार होऊन एसटीच्या उत्पन्न वाढीस मदत होणार आहे.

सल्लागाराची नियुक्ती
एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी माल वाहतूक सेवा सुरू करण्याचे विचाराधीन असले, तरी एसटी माल वाहतूक सेवा व्यवहार्य आहे की नाही, यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. ही सल्लागार समिती लवकरच आपला अहवाल सादर करणार असल्याची माहिती आहे.
 

एसटीची माल वाहतूक सेवा सुरू करण्यासंदर्भात अधिकाधिक माहिती आली नाही. यासंदर्भात उच्चस्तरीय समितीकडूनच निर्णय होईल.
- चेतना खिरवाळकर, विभागीय अधिकारी, एसटी महामंडळ, अकोला.

 

Web Title: ST will start  Cargo service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.