शेतात साचले पाणी; पिके पाण्याखाली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:20 AM2021-07-30T04:20:07+5:302021-07-30T04:20:07+5:30
................................ शेतकरी म्हणतात...! लोणार नाल्याला आलेल्या पुराच्या तडाख्यात नाल्याकाठची जमीन खरडून गेली. तसेच शेतातील पिके वाहून गेली असून, ...
................................
शेतकरी म्हणतात...!
लोणार नाल्याला आलेल्या पुराच्या तडाख्यात नाल्याकाठची जमीन खरडून गेली. तसेच शेतातील पिके वाहून गेली असून, पाण्यात बुडालेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. माझ्या चार एकर शेतापैकी अर्धा एकर जमीन खरडून गेली असून, उर्वरित साडेतीन एकर शेतातील कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने पीक नुकसानभरपाइची मदत तातडीने दिली पाहिजे.
दादाराव शिरसाट
शेतकरी, आपोती.
................फोटो..................
नाल्याला आलेल्या पुराच्या तडाख्यात जमीन वाहून गेली. तसेच चार हेक्टर शेतातील कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिकाच्या लागवडीसाठी केलेला खर्च पाण्यात बुडाला आहे. त्यामुळे सरकारने हेक्टरी २५ हजार रुपये पीक नुकसानाची मदत दिली पाहिजे.
नंदलाल डहाके
शेतकरी, घुसर.
.....................फोटो.............................
लोणार नाल्याला आलेल्या पुरामुळे शेती खरडून गेली असून, शेतातील दोन एकर कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. पीक नुकसानाचे पंचनामे करून सरकारने पीक नुकसानाची मदत तातडीने देणे गरजेचे आहे.
रवि घोडे
शेतकरी, आपातापा.
.................फोटो.................
वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीने
कपाशी करपली!
वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाल्याने शेतातील कपाशीचे पीक करपले आहे. पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, लागवडीसाठी केलेला खर्च पाण्यात बुडाला आहे. पीक नुकसानाचे पंचनामे करण्यात आले असून, नुकसानभरपाईची मदत तातडीने मिळाली पाहिजे, अशी मागणी घुसर येथील नंदलाल डहाके, विनायक येलकर, आनंद गोपनारायण आदी शेतकऱ्यांनी केली.