नाल्याअभावी शेतात साचले पाणी; पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:25 AM2021-09-16T04:25:15+5:302021-09-16T04:25:15+5:30
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील पातूर - बाळापूर रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्याच्या दुतर्फा नाल्यांचे ...
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील पातूर - बाळापूर रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याचे काम सुरू असताना रस्त्याच्या दुतर्फा नाल्यांचे बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे रस्त्यालगतच्या शेतात पाणी साचत असल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे.
वाडेगाव शिवारातील रस्त्यालगत असलेल्या अनिल सदाशिव घाटोळ, तर कुसुम मनोहर घाटोळ यांचे गट क्रमांक ४५, २ मध्ये शेतात पाणी साचल्याने कपाशी, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नाल्यांअभावी शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होत आहे.
---
रस्त्याच्या दुतर्फा नाली बांधून पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी
पातूर-बाळापूर रस्त्याचे काम सुरू असल्याने दुतर्फा माती टाकण्यात आली आहे. रस्त्यालगत नाली काढण्यात न आल्याने रस्त्यावरील पाणी शेतात शिरत असल्याने पीक खराब होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा नालीचे बांधकाम करून पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच पाणी साचल्याने झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
----