एस.टी.ची काच फोडली; आॅटोचालकाविरुद्ध गुन्हा
By admin | Published: April 20, 2017 01:16 AM2017-04-20T01:16:58+5:302017-04-20T01:16:58+5:30
बोरगाव मंजू (अकोला): राष्ट्रीय महामार्गावर काटेपूर्णा बसथांब्यावर एका आॅटोचालकाने दगड मारून एस.टी. बसचा समोरील काच फोडल्याची घटना १९ एप्रिलच्या रात्री १0 घडली.
बोरगाव मंजू (अकोला): राष्ट्रीय महामार्गावर काटेपूर्णा बसथांब्यावर एका आॅटोचालकाने दगड मारून एस.टी. बसचा समोरील काच फोडल्याची घटना १९ एप्रिलच्या रात्री १0 घडली. या प्रकरणी बसचालकाच्या तक्रारीवरून आॅटोचालकाविरुद्ध बोरगाव मंजू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
राज्य परिवहन महामंडळाची एम.एच.११ बी.एल. ९२२६ क्रमांकाची तेल्हारा आगाराची बस नागपूरहून तेल्हाराकरिता ३० प्रवासी घेऊन बुधवारी रात्री अकोल्याकडे जात होती. दरम्यान, काटेपूर्णा बसथांब्यानजीक एम.एच.३० ए.व्ही.०४७६ क्रमांकाच्या मालवाहू आॅटोला ओव्हरटेक करून बस जात असताना बसचा धक्का आॅटोला लागला. या कारणावरून आॅटो चालकाने बसचालकाशी वाद घातला व बसची समोरील काच फोडली. याबाबत बसचालक किसन गोदमले यांच्या तक्रारीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी आॅटोचालकाविरुद्ध भा.दं.वि.च्या ३५३ व ४२४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत.