स्टॅम्प विक्रेत्याची मुलगी झाली सी.ए.
By admin | Published: January 18, 2017 07:29 PM2017-01-18T19:29:04+5:302017-01-18T19:29:04+5:30
अकोल्याच्या पातूर येथील जया रणमोले या मुलीने सी.ए.ची पात्रता परीक्षा १७ जानेवारी रोजी उत्तीर्ण केली
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 18 - अकोल्याच्या पातूर येथील जया रणमोले या मुलीने सी.ए.ची पात्रता परीक्षा १७ जानेवारी रोजी उत्तीर्ण केली आहे. जया ही सी.ए.ची पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणारी पातुरातील पहिली मुलगी असून, ती येथील स्टॅम्प विक्रेत्याची मुलगी आहे, हे विशेष.
पातूर येथील स्टॅम्प विक्रेते गजानन रणमोले यांची जया ही मुलगी असून, जयाचे प्राथमिक शिक्षण तुळसाबाई कावल विद्यालयात झाले. पदवीचे शिक्षण अकोला येथील राधादेवी गोयंका महिला महाविद्यालयात झाले. सर्वसामान्य कुटुंबातील जयाने मेहनत, जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश प्राप्त केले. तिची लहान बहीण एमबीए झाली आहे, तर तिचा भाऊसुद्धा सी.ए. साठी तयारी करत आहे. या यशाकरिता आई-वडील, कोचिंग क्लासचे संचालक नीरज राठी व नमन बाहेती यांचे मार्गदर्शन लाभले, असे जयाने सांगितले.