आधार कार्ड केंद्र सुरु करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:18 AM2021-03-25T04:18:57+5:302021-03-25T04:18:57+5:30

क्षयरुग्णांची माहिती सादर करा! अकाेला: शहरातून क्षयराेगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय आराेग्य विभागाच्यावतीने कठाेर पाऊले उचलण्यात आली आहेत. ...

Start Aadhar Card Center! | आधार कार्ड केंद्र सुरु करा!

आधार कार्ड केंद्र सुरु करा!

Next

क्षयरुग्णांची माहिती सादर करा!

अकाेला: शहरातून क्षयराेगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय आराेग्य विभागाच्यावतीने कठाेर पाऊले उचलण्यात आली आहेत. खासगी रुग्णालये,क्लिनीकमध्ये क्षयराेगांचा उपचार करणाऱ्या संबंधित यंत्रणांनी क्षयराेग आढळून आलेल्या व्यक्तींची माहिती मनपाने दिलेल्या संकेतस्थळावर ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे न केल्यास संबंधित रुग्णालये,क्लिनीक विराेधात कारवाइ केली जाइल.

मनपातर्फे काेराेनाविषयक जनजागृती

अकाेला: मागील काही दिवसांपासून शहरात काेराेना पाॅझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत माेठी वाढ हाेत चालली आहे. काेराेनाचा प्रार्दूभाव पाहता जनजागृतीसाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. नागरिकांनी सुध्दा साेशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे झाले असताना तसे हाेत नसल्याचे दिसून येत आहे.

काेराेना चाचणीकडे पाठ!

अकाेला: वातावरणातील बदलामुळे अकाेलेकरांना सर्दी,खाेकला,अंगदुखी आदी संसर्गजन्य आजारांनी बेजार करून साेडले आहे. शहरात विविध आजारांची साथ पसरली असताना नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र समाेर आले आहे. काेराेनाची लक्षणे व साध्या सर्दीच्या लक्षणांमध्ये साम्य असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता काेराेना चाचणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

बाजारपेठेत साेशल डिस्टन्सींगला खाे!

अकाेला: शहरात मागील काही दिवसांपासून काेराेना विषाणूची लागण झालेल्या रूग्ण संख्येत वाढ हाेत असल्याचे समाेर आले आहे. काेराेनाची लाट लक्षात घेता नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे अपेक्षित आहे. तसे न करता नागरिक सार्वजनिक ठिकाणी तसेच बाजारपेठेत प्रचंड गर्दी करीत आहेत. यादरम्यान, नागरिकांना साेशल डिस्टन्सींगचा विसर पडल्याचे बुधवारी दिसून आले.

मुलभूत सुविधांचा बाेजवारा

अकाेला: मनपाच्या आस्थापनेवरील सफाइ कर्मचाऱ्यांना प्रशासकीय प्रभागातील तसेच खासगी सफाइ कर्मचाऱ्यांना पडीक प्रभागातील नाले,सार्वजनिक जागा, रस्त्यांची साफसफाइ करण्याची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. परंतु सफाइ कर्मचाऱ्यांवर आराेग्य निरीक्षकांचे नियंत्रण नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी साफसफाइकडे पाठ फिरवल्याने नाले,गटारे तुंबली असून मुलभूत सुविधांचा बाेजवारा उडाला आहे.

वातावरणातील बदल;मुलांमध्ये आजार

अकाेला: मागील काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल हाेत आहे. गत आठवड्यात शहरात मुसळधार पाउस झाला. तसेच दाेन तीन दिवस ढगाळ वातावरण हाेते. याचा परिणाम लहान मुलांच्या आराेग्यावर झाला असून बुधवारी खासगी रुग्णालयांमध्ये लहान मुलांची गर्दी दिसून आली.

Web Title: Start Aadhar Card Center!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.