सोयाबीन, कापूस खरेदीसाठी केंद्र सुरू करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:45 AM2017-10-24T01:45:04+5:302017-10-24T01:45:56+5:30
अकोला : शेतकर्यांचा सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू असून, पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट आली आहे. सोयाबीनचा हमीभाव अवघा ३ हजार ५0 रुपये असून, बाजारात खासगी व्यापारी दोन हजार रुपये प्रति क्विंटलनुसार सोयाबीनची खरेदी करीत आहेत. शेतकर्यांची होणारी िपळवणूक पाहता जिल्ह्यात सोयाबीन व कापूस खरेदी केंद्र ता तडीने सुरू करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

महागडे बी-बियाणे, रासायनिक खतांची खरेदी करून शेतात काबाड कष्ट करणार्या शेतकर्यांना निदान हमीभाव देण्याची नि तांत गरज आहे. जिल्ह्यात सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे.
सुरुवातीला अत्यल्प पाऊस झाल्याने त्याचा परिणाम सोयाबीनच्या उत्पादनावर झाला आहे. शेतीसाठी लागणारा खर्च व सोयाबीनच्या उत्पन्नात आलेली घट पाहता शासनाने ३ हजार ५0 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. परंतु बाजारात व्या पार्यांकडून शेतकर्यांची लूट सुरू असून, प्रतिक्विंटल शे तकर्यांना अवघे दोन हजार रुपये दिले जात आहेत.
सोयाबीनच्या पाठोपाठ जिल्ह्यात कापसाचा पेरा असून, का पसाच्या उत्पादनाला सुरुवात झाली आहे. कापूस खरेदीच्या बाबतीत व्यापार्यांचे पिळवणुकीचे धोरण पाहता शासनाने जिल्ह्यात सोयाबीन व कापूस खरेदीसाठी केंद्र सुरू करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे सोमवारी केली. कापूस पिकाच्या उत्पादनावर होणारा खर्च व उत्पन्न पाहता शासनाने किमान १0 हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी शिवसेनेने जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, बंडूभाऊ ढोरे, तालुकाप्रमुख विकास पाटील पागृत, हरिभाऊ भालतिलक, जिल्हा परिषद सर्कल प्रमुख दिनेश सरोदे, शहर प्रमुख (पूर्व) अतुल पवनीकर, शहर प्रमुख (पश्चिम) राजेश मिश्रा, नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, शशी चोपडे, शरद तुरकर, उ पशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, राहुल कराळे, योगेश गीते, नि तीन मिश्रा, योगेश अग्रवाल, केदार खरे, गजानन बोराळे, मनीष मोहोड, नंदू ढोरे, मुन्ना ठाकूर, केशव मुळे, पवन कनोजिया, अश्विन कपले, शुभम वानखडे, गणेश टाले, अभिजित गोंडचवर , गोलू थोरात, अजय पोहनकर, हिंमतराव गोमासे, अजय वाळसकर, लखन गावंडे, संजय अग्रवाल, रूपेश ढोरे, सुनील दुर्गिया, लक्ष्मण पंजाबी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.