सर्वोपचार रुग्णालयातील दिग्यांग कक्ष तत्काळ सुरू करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:18 AM2020-12-22T04:18:08+5:302020-12-22T04:18:08+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दिव्यांग बांधवांच्या ओपीडी कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बंद करण्याचे आदेश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दिव्यांग बांधवांच्या ओपीडी कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बंद करण्याचे आदेश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले होते. त्यांच्या या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो, मात्र सद्य:स्थितीत परिस्थिती बदलली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, भीतीही कमी झाली आहे. असे असतानाही सर्वोपचारमधील दिव्यांग प्रमाणपत्राची ओपीडी बंद आहे. त्यामुळे दिव्यांग बांधवांना आर्थिक लाभापासून वंचित राहावे लागत आहे. याशिवाय विविध शासकीय योजनांपासून लाभार्थी वंचित राहत आहेत, ही बाब अत्यंत गंभीर आहे. शाळा, मंदिरे, दारू दुकाने सुरू आहेत. पण दिव्यांगांचे प्रमाणपत्र असो किंवा रुग्णांविषयी उपचार बंद आहेत. त्यामुळे मागण्यांची दखल घेऊन दिव्यांग बांधवांची ओपीडी आणि प्रमाणपत्र वितरण सेवा तत्काळ सुरू करावी, अशी मागणी केली आहे. मगणी मान्य न झाल्यास महाराष्ट्र जनसेवा संघटन संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. संघटनेचे अध्यक्ष आशिष मधुकर सावळे यांच्या नेतृत्वात, शेरू मिश्रा, समीर खान, पुष्कर हिवराळे, सय्यद सईद, नितीन सपकाळ, अर्जुन बागडे, राजेश भीमकर, सूरज मेश्राम, उमेश इंगळे आदींची यावेळी उपस्थिती होती.