मनपाच्या मोहिमेचा प्रारंभ
By admin | Published: March 19, 2017 02:55 AM2017-03-19T02:55:52+5:302017-03-19T02:55:52+5:30
हिराबाई प्लॉट येथील इमारतीवर कारवाई
अकोला, दि. १८- शहरात निर्माणाधीन १८६ इमारतींचे नियमबाह्यपणे अतिरिक्त बांधकाम केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला होता. दक्षिण झोनमध्ये हिराबाई प्लॉटस्थित गायत्री मंगल कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या इमारतीचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्याची कारवाई शनिवारी मनपाच्या वतीने करण्यात आली.
महापालिकेने मंजूर केलेल्या ह्यएफएसआयह्णला ठेंगा दाखवत शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी इमारतींचे मनमानीरीत्या बांधकाम केले. तत्कालीन आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अशा निर्माणाधीन १८६ इमारतींना नोटीस जारी करून अतिरिक्त बांधकाम न करण्याची सक्त ताकीद दिली होती. महापालिका आयुक्त अजय लहाने यांनीदेखील जोपर्यंत नवीन ह्यडीसीह्णरूल लागू होत नाही, तोपर्यंत १८६ इमारतींचे बांधकाम बंद करण्याचा सूचना वजा इशारा बांधकाम व्यावसायिकांनी दिला होता. नवीन ह्यडीसीह्णरूल लागू झाल्यानंतर सुधारित चटई निर्देशांकापेक्षा अतिरिक्त चटई निर्देशांकचा वापर करून बांधकाम व्यावसायिकांनी इमारतींचे बांधकाम सुरू ठेवले. हा प्रकार लक्षात आल्यामुळे मनपा आयुक्त अजय लहाने यांनी पुन्हा एकदा १८६ इमारतींसह नवीन इमारतींच्या बांधकामाचे मोजमाप करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण झोनमधील हिराबाई प्लॉटस्थित गायत्री मंगल कार्यालयासमोर गोपीचंद धनवानी यांनी उभारलेल्या इमारतीवर कारवाई करण्यात आली. धनवानी यांनी मंजूर नकाशाव्यतिरिक्त समास अंतरमध्ये अनधिकृत बांधकाम केले होते. ही कारवाई सहायक नगररचनाकार संदीप गावंडे, अतिक्रमण अधिकारी राजेंद्र घनबहाद्दूर, विजय बडोणे, संजय थोरात आदींसह अतिक्रमण पथकातील कर्मचार्यांनी पार पाडल