पातूर येथील सिदाजी महाराज महोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:16 AM2021-04-19T04:16:33+5:302021-04-19T04:16:33+5:30
पातूर : शहरावसीयांचे आराध्य दैवत संत श्री सिदाजी महाराज यांचा १३३ वा महोत्सव दि. १३ एप्रिलपासून प्रारंभ ...
पातूर : शहरावसीयांचे आराध्य दैवत संत श्री सिदाजी महाराज यांचा १३३ वा महोत्सव दि. १३ एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. महोत्सवात कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्यात येत असून, या महोत्सवाची सांगता दि. २२ एप्रिल रोजी श्रींच्या दहीहंडीच्या कार्यक्रमाने होणार आहे.
येथील श्री सिदाजी महाराज संस्थानमध्ये मराठी कालगणनेनुसार संजीवन सोहळा उत्सव १३३ वर्षांपासून सतत अखंडपणे भाविकांच्या उपस्थितीत सुरू आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता श्री सिदाजी महाराज संस्थानतर्फे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. असा ठराव संस्थानतर्फे नुकताच घेण्यात आला आहे.
श्री सिदाजी महाराजांची विधिवत पूजा गुढीपाडव्याच्या दिवशी मंगळवारी महाअभिषेक करून गुढी उभारण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी गर्दी करू नये, कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्क वापरावे, असे आवाहन श्री सिदाजी महाराज संस्थानचे अध्यक्ष रामदासजी खोकले, महादेवराव गणेशे व समस्त श्री सिदाजी महाराज विश्वस्त मंडळाने केले आहे. (फोटो)
-------------------------------------
आगर येथील संत सखाराम महाराज यात्रा महोत्सव रद्द
आगर : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे येथील श्री संत सखाराम महाराज यांचा यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे. संत सखाराम महाराज यात्रा ही दरवर्षी गुढीपाडव्याच्या नंतर पंचमीला भरते. जवळपास आठ ते दहा खेड्यातील भाविक यात्रेत सहभागी होत असतात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली असून, भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.