नॉन कोविड रुग्णासाठी सुपर स्पेशालिटी सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:18 AM2021-04-22T04:18:28+5:302021-04-22T04:18:28+5:30

मेडिकल कॉलेजमधील समस्या व नियोजनसंबंधी आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले की, सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल सुरू करण्यासाठी ...

Start a super specialty for non covid patient | नॉन कोविड रुग्णासाठी सुपर स्पेशालिटी सुरू करा

नॉन कोविड रुग्णासाठी सुपर स्पेशालिटी सुरू करा

Next

मेडिकल कॉलेजमधील समस्या व नियोजनसंबंधी आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले की, सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल सुरू करण्यासाठी गेली एक वर्षांपासून राज्य सरकारकडे वारंवार करण्यात आली. परंतु कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही आता कोविड १९ रुग्णांसोबतच दुर्धर आजारांनी ग्रस्त नागरिकांना औषधोपचारासाठी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून अशा आणीबाणीच्या काळात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तत्काळ सुरू करण्याची मागणी राज्य सरकार तसेच मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये यांचेकडे पाटील यांनी केली त्यापूर्वी त्यांनी कोविड १९च्या वॉर्डांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन रुग्णांची विचारपूस केली, तसेच व्हेंटिलेटरची सुविधा,आयसीयू वॉर्ड,ऑक्सिजन प्लांटची पाहणी, रुग्णालयातील रेमडेसिविर इंजेक्शन उपलबधता, रुग्णालयातील ४५० कोविड रुग्णांच्या बेडच्या प्रमाणात HRCT (सिटी स्कॅन)चे प्रमाण वाढविणे, रुग्ण व रुग्णांच्या नातेवाइकांसाठी व्हिडिओ कॉन्फरसिंगची सुविधा उपलब्ध करणे, रुग्णाच्या नातेवाइकांसाठी कौन्सिलिंगची सुविधा करणे इत्यादी बाबीवर चर्चा करून प्रशासनाला योग्य निर्देश दिले, यावेळी डॉ सुमंत घोरपडे,डॉ अष्टपुत्रे,डॉ सिरसाम,डॉ नेताम,भाजपा नेते डॉ. अशोक ओळंबे, नगरसेवक हरीश अलीमचंदानी, अभ्यागत समिती सदस्य दीपक मायी,अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश पदाधिकारी हाजी चांदखा,भाजपा जिल्हा सदस्य संजय चौधरी,नगरसेवक आशिष पवित्रकार,सचिन पाटील,आशिष शर्मा,जमिरखान,भवानी प्रताप यांची उपस्थिती होती.

Web Title: Start a super specialty for non covid patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.