निवडणुकीची लगबग सुरू
By Admin | Published: September 13, 2014 01:21 AM2014-09-13T01:21:09+5:302014-09-13T01:21:09+5:30
आचारसंहिेतेची अंमलबजावणी : अकोला जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रात राजकीय मोर्चेबांधणीलाही वेग.
अकोला: विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगामार्फत शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. ३३ दिवस चालणार्या निवडणुकोत्सवाला प्रारंभ झाल्याच्या पृष्ठभूमीवर राजकीय मोर्चेबांधणीलाही वेग आला आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार या निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवार, १२ सप्टेंबरपासून लागू करण्यात आली आहे. येत्या १५ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानुषंगाने आता निवडणुकीची लगबग सुरू झाली असून, राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीलाही गती आली आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून मतदानाच्या दिवसापर्यंत ३३ दिवसांच्या निवडणुकोत्सवाला प्रारंभ झाला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच जिल्हा प्रशासनामार्फत आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग होणार नाही, यासाठी निवडणूक प्रचाराच्या काळात उमेदवार व राजकीय पक्षांकडून होणारा वाहनांचा वापर, प्रचार साहित्य, सभा, रॅली, बॅनर याबाबत परवानगी काढावी लागेल यावर नेमण्यात आलेल्या पथकांचे लक्ष राहणार आहे.
पदाधिकार्यांची वाहने जमा करण्याचा आदेश!
विधानसभा निवडणुकीचा आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकार्यांची शासकीय वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी शुक्रवारी दिला. महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितींचे गटविकास अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा उपनिबंधकांना पत्राद्वारे याबाबत आदेश देण्यात आले.
भूमिपूजन कार्यक्रमांना ह्यब्रेकह्ण!
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू होऊ शकते, त्यामुळे गेल्या दोन-तीन महिन्यां पासून आमदार निधी व इतर योजनांतर्गत गावागावांत विकास कामांचे भूमिपूजन आणि लोर्कापण कार्यक्रमांचा सपाटा सुरू झाला होता. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमांना ह्यब्रेकह्ण लागणार आहे. या कार्यक्रमांच्या व्यस्ततेतून लोकप्रतिनिधींचीही सुटका झाली असली तरी, निवडणूक प्रचाराच्या कार्यात सक्रियता वाढणार आहे.
बॅनर, फलक काढा; आचारसंहितेचे पालन करा!
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने, शासकीय व सार्वजनिक ठिकाणी लावण्या त आलेले राजकीय पक्षाचे बॅनर, फलक, होर्डींग्ज काढण्याची कार्यवाही सुरू करून, आचारसंहि तचे काटेकार पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्व उ पविभागीय अधिकारी, तहसीलदार व सर्वच संबंधित अधिकार्यांना शुक्रवारी दिले.
निवडणुकीच्या कामासाठी १0 नोडल अधिकारी!
जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, आकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या पाचही विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण शिंदे यांनी १0 नोडल अधिकार्यांची नेमणूक शुक्रवारी केली आहे. त्यामध्ये अपर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर, उपजिल्हाधिकारी एम.डी.शेगावकर, प्रमोद दुबे, अनिल खंडागळे, उदय राजपूत, जिल्हा सांख्यिकी अधिकारी डी.पी.पाटील, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा कोषगार अधिकारी एस.बी.सोनी, रोहयो कक्षाचे उपअभियंता विभुते, शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे समन्वयक प्रकाश अंधारे यांचा समावेश आहे.नोडल अधिकार्यांसह सहाय्यक अधिकारी व कर्मचार्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे.
राजकीय वातावरण तापले; इच्छुकांची प्रतिष्ठा पणाला!
आचारसंहिता लागू झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण तापण्यासही सुरुवात झाली आहे. त्यामध्ये निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या जिल्ह्यातील विद्ममान आमदारांसह इच्छुक उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या सर्वच इच्छुकांपैकी कोणाकोणाला पक्षाची उमेदवारी दिली जाते, याकडे आता राजकारण्यांचे लक्ष लागले आहे.