राज्यस्तरीय गणलक्ष्मी करंडक एकपात्री स्पर्धा १६ जानेवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 05:56 PM2021-01-03T17:56:35+5:302021-01-03T17:56:41+5:30

One Act Play competition १६ जानेवारी २०२१ रोजी गणपतराव जाधव व लक्ष्मीबाई जाधव स्मृती राज्यस्तरीय ‘ गणलक्ष्मी करंडक एकपात्री साभिनय स्पर्धा ’ रंगणार आहे.

State level Ganalakshmi Trophy One Act Play competition on 16th January | राज्यस्तरीय गणलक्ष्मी करंडक एकपात्री स्पर्धा १६ जानेवारीला

राज्यस्तरीय गणलक्ष्मी करंडक एकपात्री स्पर्धा १६ जानेवारीला

googlenewsNext

अकाेला: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मलकापूर - अकोला शाखा व श्री शिवाजी महाविद्यालय (मराठी विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १६ जानेवारी २०२१ रोजी गणपतराव जाधव व लक्ष्मीबाई जाधव स्मृती राज्यस्तरीय ‘ गणलक्ष्मी करंडक एकपात्री साभिनय स्पर्धा ’ रंगणार आहे. शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात सकाळी १०. ३० वाजता सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी नोंदणी सुरू आहे.

स्पर्धेत प्रथम पुरस्कार विजेत्यास '' गणलक्ष्मी करंडक '' व रंगकर्मी विशाल डीक्कर स्मृतीप्रित्यर्थ ५५५५ रुपये रोख पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. द्वितीय पुरस्कार स्मृती चिन्ह व साहेबराव देशमुख स्मृतीप्रित्यर्थ ३३३३ रुपये रोख तथा तृतीय पुरस्कार स्मृतीचिन्ह व वसंतराव रावदेव स्मृतिप्रित्यर्थ २२२२ रुपये रोख पारितोषिक प्रदान करण्यात येईल. याशिवाय १० स्पर्धकांमागे एक असे दादासाहेब रत्नपारखी स्मृतिप्रित्यर्थ ५०१ रुपये रोख उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

स्पर्धा सामान्यतः १८ वर्षावरील सर्वांसाठी खुली राहील. स्पर्धकाला किमान ५ व कमाल ७ मिनिटांत सादरीकरण करता येईल. स्पर्धेची भाषा मराठी वा मराठी बोली भाषाच असावी. जुन्या- नव्या नाटक , कथा- कादंबरी तथा एकांकिकेतील उताऱ्या ऐवजी नव्या व स्वतंत्र संहितेचा प्राधान्य देण्यात येईल . स्पर्धकाला किमान दोन पात्रं सादर करणे आवश्यक. जात , धर्म , पंथ , वंश वा व्यक्तीच्या भावना दुखावणारी संहिता नसावी. स्पर्धेत अश्लीलतेचा स्थान असणार नाही. संहितेच्या तीन प्रती संयोजकांकडे सादर कराव्या लागतील. स्पर्धेत १२ जानेवारीपर्यंत प्रवेश देण्यात येईल, तरी स्पर्धेत सहभागी हाेण्याचे आवाहन प्रा .मधू जाधव यांनी केले आहे.

Web Title: State level Ganalakshmi Trophy One Act Play competition on 16th January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.