राज्यस्तरीय गणलक्ष्मी करंडक एकपात्री स्पर्धा १६ जानेवारीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:16 AM2021-01-04T04:16:59+5:302021-01-04T04:16:59+5:30
स्पर्धेत प्रथम पुरस्कार विजेत्यास ‘गणलक्ष्मी करंडक’ व रंगकर्मी विशाल डिक्कर स्मृतिप्रीत्यर्थ ५५५५ रुपये रोख पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात येणार ...
स्पर्धेत प्रथम पुरस्कार विजेत्यास ‘गणलक्ष्मी करंडक’ व रंगकर्मी विशाल डिक्कर स्मृतिप्रीत्यर्थ ५५५५ रुपये रोख पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. द्वितीय पुरस्कार स्मृतिचिन्ह व साहेबराव देशमुख स्मृतिप्रीत्यर्थ ३३३३ रुपये रोख तथा तृतीय पुरस्कार स्मृतिचिन्ह व वसंतराव रावदेव स्मृतिप्रीत्यर्थ २२२२ रुपये रोख पारितोषिक प्रदान करण्यात येईल. याशिवाय दहा स्पर्धकांमागे एक असे दादासाहेब रत्नपारखी स्मृतिप्रीत्यर्थ ५०१ रुपये रोख उत्तेजनार्थ पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
स्पर्धा सामान्यतः १८ वर्षांवरील सर्वांसाठी खुली राहील. स्पर्धकाला किमान ५ व कमाल ७ मिनिटांत सादरीकरण करता येईल. स्पर्धेची भाषा मराठी वा मराठी बोली भाषाच असावी. जुन्या-नव्या नाटक, कथा-कादंबरी तथा एकांकिकेतील उताऱ्याऐवजी नव्या व स्वतंत्र संहितेचा प्राधान्य देण्यात येईल. स्पर्धकाला किमान दोन पात्रं सादर करणे आवश्यक. जात, धर्म, पंथ, वंश वा व्यक्तीच्या भावना दुखावणारी संहिता नसावी. स्पर्धेत अश्लीलतेचा स्थान असणार नाही. संहितेच्या तीन प्रति संयोजकांकडे सादर कराव्या लागतील. स्पर्धेत १२ जानेवारीपर्यंत प्रवेश देण्यात येईल, तरी स्पर्धेत सहभागी हाेण्याचे आवाहन प्रा .मधू जाधव यांनी केले आहे.