राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा : अकोला हॉकी संघ २-१ ने विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 09:22 PM2017-12-22T21:22:16+5:302017-12-22T21:32:25+5:30
अकोला: ब्रह्मपुरी (चंद्रपूर) येथे सुरू असलेल्या नितीन मिसार स्मृती राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात अकोला संघाने नागपूर अकादमीचा २-१ ने पराभव करीत स्पर्धेला विजयी सलामी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: ब्रह्मपुरी (चंद्रपूर) येथे सुरू असलेल्या नितीन मिसार स्मृती राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात अकोला संघाने नागपूर अकादमीचा २-१ ने पराभव करीत स्पर्धेला विजयी सलामी दिली.
नागपूर अकादमी संघाने पहिल्या १0 मिनिटात एक गोलने आघाडी घेऊन खेळत असतानाच, अकोला संघाचे रवी गायकवाड, चंदन ठाकूर आणि कुणाल सावदेकर यांनी जोरदार आक्रमक खेळीला सुरुवात केली. अशा परिस्थितीतच चंदन ठाकूर याने एक गोलची परतफेड करू न सामना बरोबरीत आणला. नागपूर संघानेदेखील यानंतर जोर धरत आक्रमक खेळीचे प्रदर्शन केले. मात्र, मध्यंतरापर्यंत नागपूरचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.
मध्यंतरानंतर कुणाल सावदेकर याने एक गोल करू न अकोला संघाला आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या निर्धारित क्षणापर्यंत ही आघाडी कायम राखण्यास अकोला संघाला यश मिळाल्याने सामन्यावर विजय मिळविता आला. कुणाल सावदेकर याने आजच्या सामन्यात अतिशय सुंदर खेळप्रदर्शन करीत प्रेक्षकांची दाद मिळविली.
हा सामना बघण्याकरिता अकोल्याचे ज्येष्ठ हॉकीपटू तथा विदर्भ हॉकी संघटनेचे नवनियुक्त सचिव विनोद गवई यांची विशेष उपस्थिती होती. अकोला हॉकी संघटनेचे सचिव संजय बैस, गुरुमित गोसल, पोलीस विभागाचे हॉकीपटू विजय झटाले, सुदेश यादव यांनी विजयी संघातील सर्व खेळाडूंचे कौतुक केले. खेळाडूंना प्रशिक्षक रमेश शेलार यांचे मार्गदर्शन लाभले.