राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन फेब्रुवारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 05:00 PM2019-10-15T17:00:14+5:302019-10-15T17:00:19+5:30
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन २ व ३ फेब्रुवारी २०२० ला भव्य स्वरूपात आयोजित करण्याचे ठरवले आहे.
अकोला: मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रीय,सामाजिक, पुरोगामी विचारांचे ७ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन २ व ३ फेब्रुवारी २०२० ला भव्य स्वरूपात आयोजित करण्याचे ठरवले आहे. त्यासंदर्भात रविवार, १३ आॅक्टोबर रोजी आयोजन समितीची बैठक पार पडली. यामध्ये संमेलनाचे आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. राष्ट्रसंत साहित्य संमेलनात श्री तुकडोजी महाराज यांच्या समग्र साहित्याचा प्रचार व प्रसार प्रचंड प्रमाणात व्हावा हाच आयोजनाचा मुख्य हेतू असून,त्याकरिता अकोला येथील श्रीगुरुदेव प्रेमी गेल्या सात वर्षांपासून झटत आहेत. तसेच संमेलनामध्ये राज्यभरातून संत साहित्यिक, लेखक, पत्रकार , प्रचारक, व्याख्याते, समीक्षक, राष्ट्रीय कीर्तनकार, गायक, कवि, डॉक्टर, प्राध्यापक, युवा शेतकरी,विद्यार्थी उपस्थित राहतात. दोन दिवसीय अयोजनाकरिता मार्गदर्शन समिती,सल्लागार समिती, आयोजन समिती,कार्यवाहक समिती, साहित्यिक समितीद्वारे आयोजनामध्ये नियोजित केलेले असतात. रविवारी झालेल्या बैठकीत रामेश्वर बरगट, मधुकर सरप, डॉ. ममता इंगोले, सुरेशराव महल्ले, हभप सावळे गुरुजी, ज्ञानेश्वर साकरकर,गजानन जळमकार, आकाश हरणे, गोपाल गाडगे, शिवा महल्ले,धनंजय मिश्रा, डॉ. निलेश पाटिल,श्रीकृष्ण ठोबरे,राजेंद्र झामरे आदी उपस्थित होते.